Join us  

भारताने जिंकलेल्या विश्वचषकातील पाच सामने होते फिक्स?

आता या विश्वचषकातील पाच सामने फिक्स असल्याची धक्कादायक माहिती आहे पुढे येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 1:45 PM

Open in App
ठळक मुद्दे2012 साली झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचेही या डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटले गेले आहे.

नवी दिल्ली : भारताने 2011 साली विश्वचषकाला गवसणी घातली. भारतीय खेळाडूंचे स्वप्न सत्यात उतरले. त्यामुळेच त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. भारतीयांनी तर रात्रभर या विजयाचा जल्लोश केला होता. पण आता या विश्वचषकातील पाच सामने फिक्स असल्याची धक्कादायक माहिती आहे पुढे येत आहे.

एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने 54 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री बनवली आहे. यामध्ये भारतामध्ये झालेल्या तीन सामन्यांमध्ये स्पॉट फिक्संग झाल्याचे या डॉक्यूमेंट्रीमध्ये सांगण्यात आले आहे.  'क्रिकेट के मैच फिक्सर्स: द मुनवर फाइल्स' असे या डॉक्यूमेंट्रीचे नाव आहे. 2011 साली झालेल्या विश्वचषकातील पाच आणि 2012 साली झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचेही या डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटले गेले आहे.

विराट आणि रोहितही फिक्संगच्या जाळ्यातआयसीसीच्या रडारवर मुनवर नावाचा एक मॅच फिक्सर आहे. या मुनवरने 2011 साली लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात फिक्संग झाल्याचे सांगितले आहे. या मुनवरबरोबर विराट आणि रोहित यांचे संबंध असल्याचेही पुढे आले आहे.

आयसीसी करणार चौकशीस्पॉट आणि मॅच फिक्संगचे आरोप झाल्यावर क्रिकेट विश्व ढवळून निघाले आहे. आयसीसीनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

टॅग्स :मॅच फिक्सिंगविश्वचषक ट्वेन्टी-२०विराट कोहलीरोहित शर्माआयसीसी