IPL 2023 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठीची अंतिम यादी BCCI ने आज जाहीर केली. या ऑक्शनसाठी ९९१ खेळाडूंनी आपापली नावं नोंदवली होती, परंतु त्यातील ३६९ खेळाडू १० फ्रँचायझींनी निवडले आहेत. शिवाय फ्रँचायाझींनी अतिरिक्त ३० खेळाडूंची नावं सुचवली आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची संख्या ४०५ अशी झाली आहे. यामध्ये २७३ भारतीय व १३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ११९ खेळाडू हे राष्ट्रीय संघांकडून खेळले आहेत आणि २८२ खेळाडूंना अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. यापैकी ८७ खेळाडूंनाच संधी मिळणार आहे.
![]()
२ कोटी ही सर्वोच्च किंत आहे आणि त्यात १९ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. १.५ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये ११ खेळाडूंचा समावेश आहे. मनीष पांडे व मयांक अग्रवाल हे दोन भारतीय खेळाडू १ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये आहेत. २३ डिसेंबरला दुपारी २.३० वाजल्यापासून लिलावाला सुरूवात होणार असून पहिल्या सेटमध्ये मयांक अग्रवाल, ब्रूक, अजिंक्य रहाणे, जो रूट, रिली रोसोवू, केन विलियम्सन यांच्यावर बोली लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सॅम कुरन, कॅमेरून ग्रीन, शाकिब अल हसन, जेसन होल्डर, सिकंदर रजा, ओडिन स्मिथ व बेन स्टोक्स यांच्यासाठी फ्रँचायझी बटवा खाली करतील. त्यानंतर टॉम बँटम, लिटन दास, हेन्रीच क्लासे, कुसल मेंडिस, निकोलस पूरन, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन आदी प्रमुख खेळाडूंवर बोली लागेल.
कोणत्या देशाचे किती खेळाडू
भारत - २७३
इंग्लंड - २७
दक्षिण आफ्रिका - २२
ऑस्ट्रेलिया - २१
वेस्ट इंडिज - २०
न्यूझीलंड - १०
श्रीलंका - १०
अफगाणिस्तान - ८
आयर्लंड - ४
बांगलादेश - ४
झिम्बाब्वे -२
नामिबिया - २
नेदरलँड्स -१
यूएई - १