Join us

Moeen Ali Big Hitting Video, IPL 2022 CSK vs RR: 4  4  6  4 - मोईन अलीची तुफान फटकेबाजी! प्रसिध कृष्णाला दिला चांगलाच चोप

मोईन अलीने ५७ चेंडूत कुटल्या ९३ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 21:34 IST

Open in App

Moeen Ali Big Hitting Video, IPL 2022 CSK vs RR: मोईन अलीच्या धडाकेबाज ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत १५० धावा केल्या. ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, जगदीशन, अंबाती रायडू या महत्त्वाच्या फलंदाजांनी निराशा केली. पण मोईन अलीने तुफान फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. सामन्यात मोईन अलीने एकाच षटकात प्रसिध कृष्णाला चोप दिला. त्याची चांगलीच चर्चा रंगली.

चेन्नईच्या पहिल्या तीन षटकांत केवळ १५ धावाच झाल्या होत्या. मोईन अलीने चौथ्या षटकात फटकेबाजीला सुरूवात केली. पहिल्या चेंडूवर मोईन अलीने लेग साईडला दमदार चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीने ऑफ साईडला चौकार लगावला. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. तर चौथ्या चेंडूवर त्याने परत एकदा लेग साईडला उत्तुंग षटकार लगावला. तर पाचव्या चेंडूवर अलीने सरळ रेषेत चौकार मारला.

मोईन अलीने केली फटकेबाजी, पाहा व्हिडीओ-

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेड मॅकॉय

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायडू, एन जगदीसन, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथीशा पाथिराना, मुकेश चौधरी

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App