कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. त्यामुळे आता हळुहळु क्रिकेटही पूर्वपदावर येऊ लागले आहे. आज दक्षिण आफ्रिकेत एका आगळ्यावेगळ्या सामन्याचं आयोजन केलं गेलं. तीन संघ, एक सामना अशा या सामन्याची संकल्पना होती. Solidarity Cup असे या सामन्याला नाव देण्यात आले आणि क्रिकेटमध्ये प्रथमच असा प्रयोग होत असल्यानं सर्वांना त्याची उत्सुकताही लागलेली होती. एबी डिव्हिलियर्सच्या इगल्स संघानं सुवर्णपदक जिंकले.
- दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या एबीच्या इगल्स संघानं 12 षटकांत 4 बाद 160 धावा केल्या. मार्करामनेही 27 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर आलेल्या काइट्स संघाला 3 बाद 138 धावाच करता आल्या. किंगफिशर संघाला 5 बाद 113 धावाच करता आल्या. त्यामुळे इगल्सच्या संघानं सुवर्णपदक जिंकलं.
-
- दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या एबीच्या इगल्स संघानं 12 षटकांत 4 बाद 160 धावा केल्या. मार्करामनेही 27 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर आलेल्या काइट्स संघाला 3 बाद 138 धावाच करता आल्या. त्यामुळे आता सुवर्णपदकासाठी किंगफिशर संघाला 160हून अधिक धावा कराव्या लागणार आहेत
-
-
- एबी डिव्हिलियर्सही 24 चेंडूंत 64 धावा करून माघारी परतला
इगल्सचा तिसरा फलंदाज माघारी
- एबी डिव्हिलियर्सच्या संघांनं तुफान फटकेबाजी केली, मार्करमानं 27 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, तर इगल्सनी शतकी वेस ओलांडली
- आता एबीचा इगल्स संघ प्रथम फलंदाजी करणार
- काईट्सच्या 6 षटकांत 1 बाद 58 धावा


- तीन टीम, एक मॅच; आज रंगणार क्रिकेटचा जबरदस्त सामना, जाणून घ्या संघ, वेळ अन् नियम!
- एबी डिव्हिलियर्सच्या इगल्स संघाच्या सहा षटकांत 1 बाद 66 धावा
- mr 360 मैदानावर; इगल्सच्या 3 षटकात 23 धावा
- इगल्सच्या पहिल्या षटकात 7 धावा
- एबी डिव्हिलियर्सच्या इगल्स संघाकडून एडन मार्कराम व व्हॅन डेर ड्युसेन आले सलामीला

अशी झाला प्रथम फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात तीन संघ सहभागी झाल्यामुळे नाणेफेक कशी होईल, याची उत्सुकता होती. त्यातही एक शक्कल लढवण्यात आली. तीनही संघाच्या कर्णधारांसमोर तीन बॉक्स ठेवण्यात आले आणि त्यात नंबर असेलेले चेंडू होते. 1 नंबरचा चेंडू ज्याला मिळेल त्याची पहिली फलंदाजी... एबी डिव्हिलियर्सनं पहिला बॉक्स निवडला आणि त्यात 3 क्रमांकाचा चेंडू निघाला. त्यानंतर टेंबा बमूमानं चेंडू निवडला आणि रिझा हेनड्रीक्स यानं.... त्यामुळे किंगफिशर पहिली फलंदाजी, काईट्स पहिली गोलंदाजी करणार आहेत.
काईट्सच्या गोलंदाजांचा पहिल्या दोन षटकात संयमानं फलंदाजी करणाऱ्या किंगफिशरच्या खेळाडूंनी नंतर तुफान फटकेबाजी केली. जॅनेमन मलाननं तुफान फटकेबाजी केली. पाच षटकांत अर्धशतकी धावा फलकावर झळकावल्यानंतर किंगफिशरला पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ मलानही माघारी परतला. त्यानं 15 चेंडूंत 31 धावा चोपल्या. किंगफिशर्सनं सहा षटकांत 2 बाद 56 धावा केल्या.