Join us  

IND vs ENG : भारत-इंग्लंड सामना पाहणे पडले महागात; IIM Ahmedabad च्या २८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

India vs England 1st T20I, 28 Test Positive For Coronavirus in IIM Ahmedabad Campus IIMAतील पाच विद्यार्थी १२ मार्चला झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) गेले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:50 PM

Open in App

India vs England, 1st T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियमवर परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे उर्वरित तीन सामने बंद स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट्स अहमदाबाद Indian Institute of Management's Ahmedabad (IIMA) चे काही विद्यार्थी या मालिकेतील पहिला ट्वेंटी-२० सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्यामुळे IIMA तील २८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. India vs England 1st T20I

अहमदाबाद मिररनं दिलेल्या माहितीनुसार IIMAतील पाच विद्यार्थी १२ मार्चला झालेल्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) गेले होते. १६ मार्चला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या IIMA मधील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरूवात झाली. IIMAच्या कॅम्पसमध्ये जवळपास २५०० जण आहेत आणि यापैकी काही जण कॅम्पसबाहेर कामासाठीही जातात. टीम इंडियात आणखी एकाचे पदार्पण, श्रेयस अय्यरच्या जागी स्फोटक फलंदाजाची एन्ट्री, जाणून घ्या Playing XI

''गुरूवारी आम्ही ९० लोकांची कोरोना चाचणी केली आणि शुक्रवारी त्याचा रिपोर्ट मिळणे अपेक्षित आहे,''असे एका अधिकाऱ्यानं नाव  न सांगण्याच्या अटीवर अहमदाबाद मिररला सांगितले. ''कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर आम्ही कॅम्पसमधील नियम अधिक कडक केले आहेत. असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना इंस्टिट्यूटनं आयसोलेट केले नसल्याचा आरोप PGP-2 च्या विद्यार्थ्यांनी केला आहे. १८-१९ मार्चला झालेल्या ऑफलाईन परीक्षेतही त्या विद्यार्थ्यांना परवानगी दिली होती, असाही आरोप होत आहे.  गरीबीशी संघर्ष करून पूर्ण केलं स्वप्न; भारताचे ८ क्रिकेटपटू ज्यांनी जगावर गाजवलं राज्य!

IIMAकडून आरोपांचे खंडन  

''विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही परिक्षा देण्यास परवानगी दिली नाही. त्यांचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना वैद्यकिय रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांनी फिटनेस सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाईल,''असे एका अधिकाऱ्यानं सांगितले.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडनरेंद्र मोदी स्टेडियमकोरोना वायरस बातम्या