भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवार (२५ ऑक्टोबर) सिडनी येथे झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार ठरले सलामीवीर रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली, यांनी एकूण १६८ धावांची निर्णायक भागीदारी केली.
रोहित शर्माने या अंतिम सामन्यात १२५ चेंडूंचा सामना करत १२१ धावांची जबरदस्त शतकी खेली केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर विराट कोहलीनेही ८१ चेंडूंचा सामना करत ७४ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार ठोकले. या सामन्यात या दोघांनी मिळून एकूण २० चौकार लगावले. महत्वाचे म्हणजे, आतापर्यंत या दोघांंनीही वनडे क्रिकेटमध्ये १००० हून अधिक चौकार ठोकले आहेत.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकणारे टॉप-७ फलंदाज :
क्रमांक खेळाडू (देश) चौकार संख्या सामने
१. सचिन तेंडुलकर (भारत) २०२६ ४६३
२. सनथ जयसूर्या (श्रीलंका) १५०० ४४५
३. कुमार संगाकारा (श्रीलंका) १३८५ ४०४
४. विराट कोहली (भारत) १३३२ ३०५
५. रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) १२३१ ३७५
६. ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) ११६२ २८७
७. वीरेंद्र सेहवाग (भारत) ११३२ २५१
रोहित शर्मा कितव्या स्थानावर? -
रोहित शर्माचा विचार करता, आतापर्यंत त्याने २७६ सामने खेळत १०६६ चौकार ठोकले आहेत. एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्यांच्या यादीत तो १२ व्या क्रमांकावर आहे. याशिवाय, विराट कोहलीने ३०५ सामने खेळत आतापर्यंत १३३२ चौकार ठोकले आहेत. तो चौथ्या स्थानावर आहे.