Join us  

India Vs Sri Lanka : 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती, माजी क्रीडा मंत्र्यांचा धक्कादायक दावा

महेंद्रसिंग धोनीनं ( 91) युवराज सिंगला (21) सोबत घेऊन भारताचा विजय पक्का केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 3:22 PM

Open in App

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघानं 2011साली इतिहास घडवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप उंचावला होता. भारतीय संघानं श्रीलंकेला पराभूत करून 28 वर्षांनंतर वन डे वर्ल्ड कप जिंकला. महेंद्रसिंग धोनीचा तो विजयी षटकार आजही सर्वांच्या चांगल्या स्मरणात आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेची ती अंतिम लढत फिक्स होती, असा दावा श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे यांनी केला आहे. त्यांनी हा दावा करताना कोणतेही पुरावे मात्र दिले नाहीत. त्यांंनी श्रीलंकेतील वेबसाईट न्यूजफर्स्टला मुलाखत दिली आहे. 

आयला.... युजवेंद्र चहलनं शेअर केला मुलीचा फोटो; तिच्याबद्दल जाणून तुम्हाला बसेल धक्का

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या नाबाद 103 धावांच्या दमदार शतकाच्या जोरावर त्यांनी 6 बाद 274 धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग भोपळाही न फोडता माघारी परतला, तर सचिन तेंडुलकर केवळ 18 धावांवर परतला. यामुळे भारताचा डाव 2 बाद 31 धावा असा अडचणीत आला होता. मात्र विराट कोहली (35) आणि गौतम गंभीर (97) या दिल्लीकरांनी भारताचा डाव केवळ सावरलाच नाही, तर या विश्वविजयाचा पायाही रचला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.  ही जोडी माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं ( 91) युवराज सिंगला (21) सोबत घेऊन भारताचा विजय पक्का केला. ( Yuvraj Singhनं 2011च्या वर्ल्ड कप फायनलसाठी बॉलिवूडच्या 'Hot' अभिनेत्रीला दिलेलं स्पेशल तिकीट!)

अलुठगमागे हे 2011मध्ये श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी सांगितले की,''मी या वक्तव्याची संपूर्ण जबाबदारी घेतो. फक्त मला याबाबत अधिक खुलासा करायचा नाही, कारण मला देशाची इभ्रत महत्त्वाची आहे. 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती. यात कोणता खेळाडू सहभागी नव्हता, परंतु एक गट होता जो या कटात सहभागी होता.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Big News : सात वर्षांच्या बंदीनंतर एस श्रीसंतचे संघात पुनरागमन होणार

कोरोना पॉझिटिव्ह शाहिद आफ्रिदीचा नवा व्हिडीओ व्हायरल; म्हणतो, 'त्या' सर्व अफवा!

निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!

शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम

पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली बनला 'स्ट्रीट डान्सर'; Video Viral 

भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण

टॅग्स :आयसीसीभारत विरुद्ध श्रीलंकामॅच फिक्सिंग