Join us  

2 New IPL Teams in 2022 : नव्या फ्रँचायझीसाठी ७००० कोटींची सर्वाधिक बोली लागली, जाणून घ्या कोणी, कोणती फ्रँचायझी विकत घेतली!

2 New IPL Teams in 2022 Including Name, Owner, Price – Updated : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नवीन संघ दाखल झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 7:24 PM

Open in App

2 New IPL Teams in 2022 Including Name, Owner, Price – Updated : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. BCCI या दोन संघांसाठी निविदा मागवल्या होत्या आणि आज जवळपास ४ तासांच्या छाननीनंतर १० निविदा अंतिम टप्प्यासाठी निवडण्यात आल्या. All Cargo Logistics, Adani Group, RP Sanjiv Goenka आणि Uday Kotak  या चार कंपनींमध्ये दोन नव्या फ्रँचायझींसाठी चुरस पाहायला मिळाली. पण, यात भलत्याच कंपनीनं बाजी मारली. दोन संघांच्या बोलीसाठी  २२ कंपन्यांनी १० लाख रुपये निविदा कागदपत्रे विकट घेतले होते. #IPLNewTeam

RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींची बोली लावली ( RPSG highest bid at INR 7000 CR.) संजीव गोएंका यांच्याकडे पुणे रायजिंग सुपरजायट्सं फ्रँचायझीचे मालकी हक्क होते आणि दोन वर्ष त्यांचा संघ आयपीएलमध्ये खेळला होता. आता पुन्हा आयपीएलमध्ये एन्ट्री घेतल्यानं संजीव गोएंका आनंदी झाले आहेत. हे पहिलं पाऊल असून आता चांगला संघ तयार करण्याचं महत्त्वाचं काम करायचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली आहे.  संजीव गोएंका यांच्याकडे लखनौ फ्रँचायझीचे मालकी हक्क गेले आहेत.

CVC Capital यांनी या लिलावात दुसरी सर्वाधिक बोली लावून फ्रँचायझी नावावर केली. त्यांनी ५,१६६ कोटींची बोली लावली.  त्यामुळे अदानी ग्रुप व मँचेस्टर युनायटेडचा ग्रुप यांची फ्रँचायझी आयपीएल २०२२ त दिसणार नाही. ( No Adani and Machester United owners for IPL 2022.) CVC Capital ने अहमदाबाद फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. ( The RPSG Group have picked Lucknow as their home base with a winning bid of INR 7090 crores while CVC Capital have opted for Ahmedabad with a bid of INR 5166 crores)

अदानी ग्रुपनं ५००० कोटींची बोली लावली होती. टोरेंट, मँचेस्टर युनायटेड, ऑरोबिंडो यांच्यापैकी एकही ५००० कोटींच्या आसपास आला नाही. त्यामुळे  RP-Sanjiv Goenka Group आणि CVC यांनी बाजी मारली.   

Live Updates 

  • बिड सबमिशन पूर्ण झाले असून त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. 
  • बोली लावणाऱ्यांमध्ये Rhiti Sports ही कंपनी होती, परंतु त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला. या कंपनीचा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सोबत करार असल्यानं हा निर्णय घेतला गेला.  
  • अदानी ग्रुप व मँचेस्टर युनायटेड यांना दोन नव्या संघांचे मालकी हक्क मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि EPL मधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड हे आघाडीवर होते.   
  • भारतात सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले गौतम अदानी आणि त्यांचा समूह अहमदाबाद फ्रँचायजीसाठी बोली लावली होती.  अब्जाधीश संजीव गोयंका यांनी देखील फ्रँचायजीसाठी बोली लावली. 
  • कमीत कमी ३५०० कोटी रुपयांची संभाव्य बोली लागण्याची अपेक्षा आहे. आयपीएल प्रसारण अधिकारातून जवळपास ५ बिलियन डॉलर(३६ हजार कोटी) मिळण्याचा अंदाज असल्याचं सांगण्यात येत आहे. गोयंका दोन वर्ष रायजिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक होते.   
टॅग्स :आयपीएल २०२१अदानी
Open in App