आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले. आरसीबीविरुद्ध सामन्यात चेन्नईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेने २५ चेंडूत सुपरफास्ट अर्धशतक झळकावले. या कामगिरीसह तो आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा तिसरा युवा फलंदाज ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (१४ वर्षे ३२ दिवस) हा सर्वात युवा फलंदाज आहे. राजस्थानचा रियान पराग (१७ वर्षे १७५ दिवस) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत आयुष म्हात्रे तिसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. आयुषचे वय १७ वर्षे २९१ दिवस आहे.
आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारे सर्वात युवा खेळाडू१) वैभव सूर्यवंशी (वय- १४ वर्षे ३२ दिवस)२) रियान पराग (वय- १७ वर्षे १७५ दिवस)३) आयुष म्हात्रे (वय- १७ वर्षे २९१ दिवस)४) संजू सॅमसन (वय- १८ वर्षे १६९ दिवस)5) पृथ्वी शॉ (वय- १८ वर्षे १६९ दिवस)