Join us  

महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या अल्पवयीन आरोपीला गुजरातमधून अटक

काही दिवसांपूर्वी धोनीला सोशल मीडियावरून धमकी मिळाली होती आणि त्या धमकीत त्याची मुलगी झिवा हिचं नाव होतं.

By स्वदेश घाणेकर | Published: October 12, 2020 3:38 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) साठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) UAEत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सातपैकी त्यांनी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी धोनीला सोशल मीडियावरून धमकी मिळाली होती आणि त्या धमकीत त्याची मुलगी झिवा हिचं नाव होतं. त्यामुळे धोनीच्या रांची येथील निवास स्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. सोशल मीडियावरून झिवाला धमकी देणारा आरोपी अल्पवयीन आहे. 16 वर्षीय आरोपीला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून धोनीच्या मुलीला धमकी देण्यात आली होती. CSKने किंग्ज इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) विरुद्धचा सामना गमवल्यानंतर एका युजरने धमकी देणारा मेसेज पोस्ट केला होता. त्याच्या या धमकीचा इतरांनी चांगलाच समाचार घेतला. आकाश चोप्रा, इरफान पठाण, हर्षा भोगले आदींनी तीव्र शब्दात टीका केली. त्याच पार्श्वभूमीवर धोनीच्य रांचीतील घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या आरोपीला अटक झाली असून तो गुजरातमधील मुंद्रा येथील रहिवाशी आहे आणि तो 12वीत शिकतो. 

कच्छ ( पश्चिम) येथील पोलीस अधिकारी सौरभ सिंग यांनी आरोपीला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तपासात त्यानं धमकी दिल्याची कबुली दिली. ''नमना कपाया गावातील 12वीत शिकल असलेल्या विद्यार्थ्याला तपासासाठी आम्ही अटक केली आणि त्यानं गुन्हा कबुल केला,''असे सिंग यांनी सांगितले.  रांची पोलीस चौकीत गुन्हा नोंदवल्यानंतर तेथील पोलिसांनी सोशल मीडिया अकाऊंटची माहिती गुजरात पोलिसांना दिली. त्यावरून त्यांनी आरोपीचा शोध घेतला. त्याला रांची पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीजीवा धोनीगुन्हेगारी