Join us
Daily Top 2Weekly Top 5

कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ

१५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहचा पहिल्यांदाच सामना केला. मुंबई विरुद्ध झालेल्या या सामन्यात वैभवने झटपट खेळी करत १४ चेंडूत ३९ धावा केल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 01:15 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah Video: १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमने-सामने आल्यानंतर कोण वरचढ ठरेल, याची जोरदार चर्चा मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यापूर्वी सुरू होती. अखेर क्रिकेटप्रेमींना दोघांतील सामना बघायला मिळाला. वैभव सूर्यवंशी नेहमीच्या शैलीतच बुमराहला पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. पहिल्या तीन चेंडूंचा सामना करताना वैभवने जसप्रीत बुमराहला दोन उत्तुंग षटकार लगावले. 

गुवाहाटीत राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात झालेल्या सामन्यात सगळ्यांचे लक्ष वैभव विरुद्ध बुमराह यांच्याकडेच जास्त होते. ११-११ षटकाच्या झालेल्या या सामन्यात वैभवची वादळी खेळी बघायला मिळाली. 

मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांना धुतले

यशस्वी जयस्वालसोबत फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ सुरू केला. मुंबईकडून दुसरे षटक बुमराहने टाकले. वैभवने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार लगावला. वैभवचा हा षटकार बघून बुमराहही बघतच राहिला. दुसरा चेंडू एक धाव घेतल्यानंतर चौथ्या चेंडूवर परत षटकार लगावला. बुमराहने वैभवला पाच चेंडू टाकले. यात वैभवने दोन षटकारांसह १३ धावा केल्या. 

वैभवच्या १४ चेंडूत ३९ धावा

नेहमीच्या शैलीत फलंदाजी करत वैभवने १४ चेंडूमध्ये ३९ धावा केल्या. यात १ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. शार्दुल ठाकूरला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न तो सीमेवर झेलबाद झाला.

यशस्वी जयस्वालने झळकावले अर्धशतक

मुंबई विरूद्धच्या सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी केली. पहिल्याच षटकापासून यशस्वीने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरूवात केली. नाबाद खेळी करताना त्याने ३२ चेंडूंमध्ये ७७ धावा केल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi welcomes Bumrah with sixes in RR vs MI!

Web Summary : Young Vaibhav Suryavanshi stunned Bumrah, hitting two sixes in his first over. He scored 39 runs off 14 balls, including five sixes, during the RR vs MI match. Jaiswal also hit a blistering half-century.
टॅग्स :वैभव सूर्यवंशीआयपीएल २०२४जसप्रित बुमराहआयपीएल २०२६व्हायरल व्हिडिओ