वैभव सूर्यवंशीसारखी हवा! कोण आहे हा युवा क्रिकेटर ज्यानं वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी कुटल्या २०० धावा

सर्व गोलंदाजांना दमवलं, पण रन आउटच्या रुपात खेळीला लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:03 IST2025-08-14T13:58:32+5:302025-08-14T14:03:51+5:30

whatsapp join usJoin us
15 Year Old Theo Lamey Stunning Double Century Smashed 33 Boundaries In Under 18 Match Vibhav Suryvanshi | वैभव सूर्यवंशीसारखी हवा! कोण आहे हा युवा क्रिकेटर ज्यानं वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी कुटल्या २०० धावा

वैभव सूर्यवंशीसारखी हवा! कोण आहे हा युवा क्रिकेटर ज्यानं वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी कुटल्या २०० धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं क्रिकेटच्या मैदानात धमाकेदार फलंदाजीसह जगाचे लक्षवेधून घेतल्यावर आता १५ वर्षाच्या पोरानं मोठा धमाका केलाय. मतदानाचा अधिकार मिळण्याआधी  १८ वर्षाखालील गटातील स्पर्धेत युवा क्रिकेटरनं द्विशतक ठोकलं आहे. कोण आहे तो क्रिकेटर अन् कोणत्या स्पर्धेत त्याने केलीये वैभव सूर्यंवशीसारखी हवा? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सर्व गोलंदाजांना दमवलं, पण रन आउटच्या रुपात खेळीला लागला ब्रेक

क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकारांची बरसात करत वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी द्विशतक झळकवणाऱ्या युवा क्रिकेटरचं नाव  थियो लेमी (Theo Lamey) असं आहे. अंडर १९ काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत समरसेट संघाकडून मैदानात उतरलेल्या थियो लेमी याने ग्लुस्टरशायर संघाविरुद्ध १९६ चेंडूत २१३ धावांची दमदार खेळी केली. त्याच्या रुपात इग्लंडला वैभव सूर्यंवशी मिळालाय, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या खेळीत त्याने २७ चौकार आणि ६ षटकार ठोकले. प्रतिस्पर्धी संघातील सर्व गोलंदाज त्याच्यासमोर फिके ठरले. पण ताळमेळाच्या अभावामुळे धावबाद होत त्याच्या धमाकेदार खेळीला ब्रेक लागला.

मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)


कोण आहे लेमी ज्यानं द्विशतकासह सोडलीये छाप?

थियो लेमी हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. याशिवाय तो मध्यमगती जलदगती गोलंदीजीही करतो. याच वर्षाच्या सुरुवातीला त्याने समरसेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला आहे. इंग्लंडमधील टॉर्क्वे शहरात जन्मलेला हा युवा बॅटर स्वत:ला बॅटिंग ऑलराउंडर मानतो. याआधी थियोने स्कूल एक्सचेंज याने स्कूल एक्सेंज दमरम्यान दक्षिण आफ्रिकेतील सेंट स्टिथियन्स संघाकडून खेळताना ६२ चेंडूत नाबाद १६२ धावांची खेळी केली होती.  २०२४ मध्ये ब्रँडनिंच आणि केंटिसबेयर सीसीला डेवॉन प्रीमियर लीग स्पर्धा जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
 

Web Title: 15 Year Old Theo Lamey Stunning Double Century Smashed 33 Boundaries In Under 18 Match Vibhav Suryvanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.