IPL च्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या स्पर्धेत सर्वात महागडा सौदा झाला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन उद्योजकाच्या नेतृत्वाखालील समुहाने आयपीएल स्पर्धेची पहिली ट्रॉफी उंचावणारा राजस्थान रॉयल्स संघ खरेदी केला आहे. १.६३ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे १५,२८२ कोटी रुपयांच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सचा संघ IPL मधील सर्वात महागडा संघही ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL च्या इतिहासातील मोठी डील, राजस्थान रॉयल्स संघाची विक्री
काल सोमानी हे इंट्राएज, अकॅडेमियन आणि ट्रूयो डॉट एआय या कंपन्यांचेही मालक आहेत. या समुहात अमेरिकन उद्योगपती रॉब वॉल्टन आणि हॅम्प कुटुंबाचाही समावेश आहे. या समूहाने राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीतील पूर्ण १०० टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. रॉब वॉल्टन हे सॅम वॉल्टन यांचे ज्येष्ठ पुत्र असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १४६ अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते. सोमानी हे यापूर्वीपासूनच राजस्थान रॉयल्समध्ये गुंतवणूकदार होते. २०२१ मध्ये त्यांनी फ्रँचायझीत प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांनी या गुंतवणुकीत मोठी क्षमता दिसत असल्याचे सांगत IPL च्या भविष्याबद्दल उत्साह व्यक्त केला होता.
RCB-KSCA चा भावूक निर्णय! जीव गमावलेल्या 'त्या' ११ चाहत्यांच्या स्मरणार्थ उचललं महत्त्वाचं पाऊल
२०२१ पासून सोमानी RR फ्रँचायझीत भागीदारी
काल सोमानी यांच्या गटात अमेरिकन उद्योगपती Rob Walton आणि हॅम्प कुटुंबाचाही समावेश आहे. रॉब वॉल्टन हे Sam Walton यांचे ज्येष्ठ पुत्र असून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १४६ अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते. सोमानी हे यापूर्वीपासूनच राजस्थान रॉयल्समध्ये गुंतवणूकदार होते. २०२१ मध्ये त्यांनी फ्रँचायझीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी या गुंतवणुकीत मोठी क्षमता दिसत असल्याचे सांगत IPL च्या भविष्याबद्दल उत्साह व्यक्त केला होता.
कोण आहेत काल सोमानी?
काल सोमानी सध्या अमेरिकेतील स्कॉट्सडेल येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा जन्म भारतात झाला. १६ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर १९९८ मध्ये ते भारतातून अमेरिकेत स्थायिक झाले.गेल्या १५ वर्षांत त्यांनी एड-टेक, डेटा प्रायव्हसी, एआय गव्हर्नन्स आणि स्पोर्ट्स टेक क्षेत्रांतील अनेक स्टार्टअप्सची स्थापना आणि नेतृत्व केले आहे. ते ग्लोबल टेक सर्व्हिसेस फर्म इंट्राएज, प्रायव्हसी कंप्लायन्स प्लॅटफॉर्म ट्रूयो, एआय गव्हर्नन्स फर्म ट्रूयो डॉट एआय आणि एड-टेक सेवा देणाऱ्या अकॅडेमियनचे संस्थापक आहेत. याशिवाय ते मोटर सिटी गोल्फ क्लबचे सह-मालक असून TMRW Sports आणि TGL गोल्फ लीगमध्ये सुरुवातीचे गुंतवणूकदार म्हणूनही सहभागी आहेत.
IPL मध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रवास
२००८ च्या पहिल्या वहिल्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या संघाने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामात राजस्थानचा संघ रियान परागच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. या फ्रँचायझी संघाने २०१६ आणि २०१७ च्या हंगामात बंदीचा सामनाही केला आहे.
Web Summary : Rajasthan Royals, IPL's first champion, sold for ₹15,000 crore to a group led by Kal Somani, an Indian-American businessman. The group includes Rob Walton, of Walmart fame. Somani, an existing investor since 2021, sees great potential in IPL.
Web Summary : आईपीएल का पहला चैंपियन राजस्थान रॉयल्स 15,000 करोड़ रुपये में भारतीय-अमेरिकी व्यवसायी काल सोमानी के नेतृत्व वाले समूह को बेचा गया। समूह में वॉलमार्ट फेम के रॉब वाल्टन शामिल हैं। सोमानी, 2021 से एक मौजूदा निवेशक, आईपीएल में बड़ी क्षमता देखते हैं।