Join us  

RCBच्या १५ कोटींच्या गोलंदाजांनी लावला धावांचा SALE; ११ षटकांत दिल्या १२६ धावा, विराट कोहली टेंशनमध्ये 

Kyle Jamieson RCB इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १४व्या पर्वासाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंवर पुन्हा एकदा पैशांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला.

By स्वदेश घाणेकर | Published: March 03, 2021 4:36 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १४व्या पर्वासाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूंवर पुन्हा एकदा पैशांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. लिलावात ६१ खेळांच्या रिक्त जागेपैकी ५७ जागा भरल्या गेल्या आणि त्यांच्यासाठी १४५ कोटी ३० लाख रुपये ८ फ्रँचायझींनी मिळून खर्च केले. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सनं सर्वाधिक १६.२५ कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपर किंग्संन के गौतमला खरेदी केलं आणि तो भारताचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. एकूण २२ परदेशी खेळाडूंवर यशस्वी बोली लावली गेली. विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) आणि कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) यांच्यासाठी अनुक्रमे १४.२५ कोटी व १५ कोटी मोजले.   टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदललंय; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

मॅक्सवेलनं न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत तुफान फटकेबाजी केली. मॅक्सवेलनं जिमी निशॅमच्या एका षटकात 4,6,4,4,4,6 अशा २८ धावा चोपल्या. त्याची फटकेबाजी एवढी जोरदार होती की स्टेडियमवरील खूर्चीच तुटली. मॅक्सवेलनं ३१ चेंडूंत ८ चौकार व ५ खणखणीत षटकार खेचून ७० धावांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-20 सामन्यात एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात मॅक्सवेलनं दुसरं स्थान पटकावलं.  रिकी पाँटिंगनं २००५मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका षटकात ३० धावा चोपल्या होत्या. तेच दुसरीकडे RCBच्या ताफ्यात नव्यानं दाखल होणाऱ्या जेमिन्सननं या मालिकेत ११ षटकांत १२६ धावा दिल्या. 

न्यूझीलंडचा गोलंदाज जेमिन्सननं पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतीत धावांचा SALE लावला.  पहिल्या सामन्यात त्यानं ३ षटकांत ३२ धावा देत एक विकेट घेतली, दुसऱ्या सामन्यात ४ षटकांत ५६ आणि आजच्या सामन्यात ४ षटकांत ३८ धावा दिल्या.    अॅश्टन अॅगरनं फिरवला सामनाऑस्ट्रेलियाच्या ४ बाद २०८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला १४४ धावाच करता आल्या. ऑसी फिरकी गोलंदाज अॅश्टन अॅगरनं ४ षटकांत ३० धावा देत ६ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनन्यूझीलंडआॅस्ट्रेलिया