Sai Sudarshan, IPL 2025 GT vs DC: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा १० गडी राखून पराभव केला. केएल राहुलच्या दमदार शतकाच्या (नाबाद ११२) जोरावर दिल्लीने १९९ धावांची मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या साई सुदर्शनने ६१ चेंडूत नाबाद १०८ धावा ठोकल्या. कर्णधार शुबमन गिलदेखील ९३ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे एकही गडी न गमावता गुजरातने सामना जिंकला. या विजयासह गुजरात, पंजाब आणि बंगळुरू तिन्ही संघ प्लेऑफ्स साठी पात्र ठरले. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या साई सुदर्शनने एक ऐतिहासिक कामगिरी केली.
IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या साई सुदर्शनवर गेल्या वर्षी १० डिसेंबर २०२४ रोजी शस्त्रक्रिया झाली होती. त्या शस्त्रक्रियेतून बरा झाल्यानंतर, त्याने पुनरागमन केले आणि दमदार 'कमबॅक' केले. साई सुदर्शन गुजरात टायटन्समधील अतिशय उपयुक्त फलंदाज ठरताना दिसत आहे. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आघाडीवर आहे. त्याने १२ डावांमध्ये ५६.०९ च्या सरासरीने ६१७ धावा केल्या आहेत. या हंगामात सध्या तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. साई सुदर्शनला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोणाकडूनही स्पर्धा असेल तर तो शुभमन गिल आहे, ज्याने या हंगामात १२ डावांत ६०.१० च्या सरासरीने ६०१ धावा केल्या आहेत.
आतापर्यंत IPL स्पर्धेत तब्बल १२०० हून जास्त खेळाडू खेळले आहेत. पण साई सुदर्शनने १२०० हून अधिक खेळाडूंमध्ये आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत साईने ३७ सामन्यांच्या ३७ डावात ५०.०३ च्या सरासरीने १६५१ धावा केल्या आहेत. साई सुदर्शन हा आयपीएल कारकिर्दीत ५० किंवा त्याहून अधिक सरासरी असलेला एकमेव खेळाडू आहे. त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
Web Title: 1200 cricketers have played in IPL so far but Sai Sudarshan is the only one who played with average 50
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.