Join us

"कारकिर्दीतील १२ वर्षे तणावातच, सामन्याच्या आधी हे खुप सहन केले त्यानंतर..."; सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा

मी सामन्याच्या आधी चहा बनवणे, कपडे इस्त्री करणे या सारखी कामे करत होतो. त्यातून मला खेळाची तयारी करायला मदत मिळत होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 05:20 IST

Open in App
ठळक मुद्देमी भारतासाठी अखेरचा सामना खेळण्याच्या आधी देखील असेच केलेखेळाडूला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. मात्र हे जरुरी आहे की त्याने कठीण वेळेचा स्वीकार करावा.’मी एल्बो गार्डमुळे बॅट पूर्णपणे फिरवू शकत नाही. हे वास्तवात तथ्य होते.

नवी दिल्ली : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने खुलासा केला आहे की, २४ वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीतील एक मोठा काळ त्याने तणावातच काढला आहे. आणि तो यानंतर ही बाब समजु शकला की तणाव हा खेळाच्या आधी त्याच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोविड १९ मुळे बायोबबलमध्ये मानसिक स्वास्थ्यावर होत असलेल्या परिणामांबाबत बोलताना मास्टर ब्लास्टरने म्हटल की, यातून बाहेर येण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. 

तेंडुलकर याने एका चर्चासत्रात सांगितले की, वेळेसोबतच मी अनुभवले की, तुम्हाला मानसिक रुपाने तयार रहावे लागेल. सामना सुरू होण्याच्या आधी माझ्या मनातच वेगळा सामना सुरू होत होता. तणाव खुप वाढत असे.’ तेंडुलकर याने सांगितले की, मी १० -१२ वर्षे हा तणाव सहन केला. सामन्याच्या आधी हे खुप सहन केले. अनेकदा तर मी रात्री झोपु शकत नव्हतो. मात्र नंतर ही हे स्विकार केले हा माझ्या तयारीचा भाग होता. मी वेळेसोबतच हे मान्य केले की मला रात्री झोप लागत नाही. मी माझ्या मनाला सहज ठेवण्यासाठी दुसरेच काही तरी करायला लागायचो. त्यात फलंदाजीचा अभ्यास, टीव्ही पाहणे, व्हिडियो गेम्स खेळणे आणि सकाळचा चहा बनवणे यांचा देखील समावेश होता. ’

विक्रमी २०० वा कसोटी सामना खेळून २०१३ मध्ये निवृत्त होणाऱ्या सचिनने सांगितले की, मी सामन्याच्या आधी चहा बनवणे, कपडे इस्त्री करणे या सारखी कामे करत होतो. त्यातून मला खेळाची तयारी करायला मदत मिळत होती. हे सर्व मला माझ्या भावाने शिकवले. मी सामन्याच्या एक दिवस आधीच माझी बॅग तयार करत होतो. आणि ही एक सवयच झाली होती. मी भारतासाठी अखेरचा सामना खेळण्याच्या आधी देखील असेच केले. तेंडुलकरने सांगितले की, खेळाडूला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. मात्र हे जरुरी आहे की त्याने कठीण वेळेचा स्वीकार करावा.’

त्याने सांगितले की, जेव्हा तुम्ही दुखापतग्रस्त असतात. तेव्हा फिजियो तुमचा इलाज करतो. मानसिकस्वास्थ्याच्या बाबतीत देखील असेच आहे. कुणासाठीही चांगल्या - वाईट प्रसंगाचा सामना ही नियमित बाब आहे.’

चेन्नईच्या एका हॉटेल कर्मचाऱ्याचा किस्सा देखील सचिनने यावेळी सांगितला. त्याने सांगितले की, ‘माझ्या रुममध्ये एक कर्मचारी डोसा घेऊन आला. त्याने टेबलवर तो ठेवला आणि मला एक सल्ला दिला की, मी एल्बो गार्डमुळे बॅट पूर्णपणे फिरवू शकत नाही. हे वास्तवात तथ्य होते. त्याने मला या समस्येतुन बाहेर पडण्यात मदत केली. ’

टॅग्स :सचिन तेंडुलकर