Join us  

11 sixes, 19 fours: मुंबई इंडियन्सच्या इशान किशनची फटकेबाजी; नोंदवली विक्रमी खेळी

Ishan Kishan Vijay Hazare Trophy, Mumbai Indians इशाने यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये ५१६ धावा कुटल्या होत्या.

By स्वदेश घाणेकर | Published: February 20, 2021 2:47 PM

Open in App

आजपासून सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफी ( VijayHazareTrophy) स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इशान किशनच्या ( Ishan Kishan ) आतषबाजीचा मनमुराद आनंद लुटला गेला. IPL मध्ये मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इशानकडे झारखंड संघाचे नेतृत्व आहे. आज इंदूर येथे खेळल्या गेलेल्या मध्य प्रदेश संघाविरुद्धच्या सामन्यात इशाननं ११ षटकार आणि १९ चौकारांची बरसात केली. इशानने ९४ चेंडूंत १७३ धावा केल्या. यापैकी ७१ धावा या अखेरच्या २० चेंडूंत कुटल्या. ( Ishan Kishan's last 71 runs came in 20 balls).

इशानच्या या खेळीच्या जोरावर झारखंडने ५० षटकांत ९ बाद ४२२ धावांचा डोंगर उभा केला. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. इशानने पहिल्या ५० धावांसाठी ४२ चेंडू खेळले. विराट सिंग (६८), सुमीत कुमार ( ५२) आणि अनुकूल रॉय ( ७२) यांनीही हात धुवून घेतले. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचे ५ फलंदाज ७४ धावांत माघारी परतले आहेत.

इशाने यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये ५१६ धावा कुटल्या होत्या

टॅग्स :मुंबई इंडियन्सबीसीसीआय