Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान अन् शारजाहच नातं पुन्हा जुळणार; मार्चमध्ये क्रिकेटचा महामुकाबला होणार

भारत-पाक आणि शाहजाह हे नातं फार जूनं आहे आणि येथे अनेक अविस्मरणीय सामने पाहायला मिळाले आहेत. आता ती संधी पुन्हा उपलब्ध होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 10:42 IST

Open in App

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमधील संबंध जगजाहीर आहेत. पाकिस्तानातून सातत्यानं होत असलेल्या दहशतवादी कृत्यामुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंधच तोडले आहेत. त्यामुळे उभय देशांमध्ये क्रिकेटच्या द्विदेशीय मालिकाही होत नाहीत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अर्थात आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उभय देशांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे म्हणजे दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांना पर्वणीच.... पण, हीच पर्वणी दुबईच्या शाहजाह येथील ऐतिहासिक स्टेडियमवर पाहायला मिळाली तर? भारत-पाक आणि शाहजाह हे नातं फार जूनं आहे आणि येथे अनेक अविस्मरणीय सामने पाहायला मिळाले आहेत. आता ती संधी पुन्हा उपलब्ध होणार आहे. येत्या 11 मार्चला भारत आणि पाकिस्तान यांच्यात शाहजाह क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे.

10 पीएल वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं भारत एकादश आणि पाकिस्तान एकादश संघ 11 मार्चला शाहजाह क्रिकेट स्टेडियममध्ये भिडणार आहेत. 8 ते 13 मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ड्वेन ब्राव्हो हा या स्पर्धेचा सदिच्छादूत आहे आणि अंतिम सामन्याला तो हजेरी लावणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन मोसमात प्रत्येकी 16 संघ खेळले होते आणि यंदा 20 संघ खेळणार आहेत.

भारतीय संघ - अंकुर सिंग, ओमकार देसाई, थॉमस डायस, मोयोद्दीन शेख, कृष्णा सातपुते, उस्मान पटेल, सुमीत ढेकळे, योगेश पेंकर, अजित मोहिते, दिनेश नकराणी, सरूज, विश्वजीत ताकूर, जाफर जमाल, विजय पावळे, सुल्तान खान; प्रशिक्षक - भरत लोहार, व्यवस्थापक - जावीद शेख

पाकिस्तान संघ - शिराज अहमद, झहीर कालिया, मुबाशर अहमद, करीम खान, फहीमुल्लाह शाह, वाजीद खान, इरफान सद्दाम शाह, उस्मान पेसर, जलत खान, कर्ना झाहीद, शेबाज अहमद, नादीर, सय्यर मक्सूद, समिउल्लाह

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानदुबई