Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!

Yashasvi Jaiswal Create History: मुंबईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:11 IST

Open in App

मुंबईविरुद्ध इंडियन्स च्या सामन्यात राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने आपल्या स्फोटक फलंदाजीने गुवाहाटीच्या मैदानावर धुमाकूळ घातला. पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या कमी षटकांच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने अगदी पहिल्या चेंडूपासूनच मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी (१४ चेंडूत ३९ धावा) या दोघांनी मिळून अवघ्या ५ षटकांत ८० धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान, या सामन्यात यशस्वीच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली असून तो राजस्थानकडून खेळताना षटकारांचे शतक झळकावणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात जैस्वालने अवघ्या ३२ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. या खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने अवघ्या २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या खेळीतील चौथा षटकार ठोकून जैस्वालने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १०० षटकारांचा आकडा पूर्ण केला. याआधी राजस्थानच्या संघासाठी १०० षटकार ठोकण्याचा पराक्रम केवळ संजू सॅमसन, जोस बटलर आणि शेन वॉटसन या तीन खेळाडूंनीच केला आहे. या खास क्लबमध्ये आता यशस्वी याचाही समावेश झाला असून त्याच्या कामगिरीचे राजस्थानच्या संघाकडून कौतुक होत आहे.

राजस्थानसाठी १०० किवा त्याहून अधिक षटकार

१) संजू सॅमसन- १९२ षटकार२) जोस बटलर- १३५ षटकार३) शेन वॉटसन- १०९ षटकार४) यशस्वी जैस्वाल- १०० षटकार

राजस्थानचा दणदणीत विजय

यशस्वी जैस्वालने आपल्या खेळीच्या अगदी सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते. पहिल्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर २२ धावा कुटून त्याने सामन्याची दिशाच बदलून टाकली. त्यानंतर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज गोलंदाजही त्याच्या आक्रमक फलंदाजीसमोर तग धरू शकले नाहीत. अल्लाह गझनफरने दोन विकेट्स घेत मुंबई इंडियन्ससाठी सामन्यात काही प्रमाणात पुनरागमन घडवून आणले असले, तरी जयस्वाल मात्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर ठामपणे उभा राहिला आणि त्याने आपल्या संघाला १५०/३ या भक्कम धावसंख्येप्रत पोहोचवले. हा सामना राजस्थानच्या संघाने २७ धावांनी जिंकला.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Jaiswal's special century against Mumbai; historic feat achieved!

Web Summary : Yashasvi Jaiswal's explosive batting helped Rajasthan beat Mumbai. He smashed a century of sixes for Rajasthan, joining Samson, Buttler, and Watson. His unbeaten innings of 77 runs, including 10 fours and 4 sixes, powered Rajasthan to victory.
टॅग्स :आयपीएल २०२६यशस्वी जैस्वालऑफ द फिल्ड