T20 World Cup Matches Live Streaming : न्यूझीलंडसह झिम्बाब्वेसाठी Super 8 ची संधी!

न्यूझीलंडसह झिम्बाब्वेचा संघ सुपर ८ चं तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:49 IST2026-02-17T10:47:02+5:302026-02-17T10:49:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
New Zealand vs Canada And Ireland vs Zimbabwe Two Teams Chance Super Eight Spots At ICC T 20 World Cup 2026 Know About NZ vs CAN And IRE vs ZIM Live Streaming When Where And How To Watch | T20 World Cup Matches Live Streaming : न्यूझीलंडसह झिम्बाब्वेसाठी Super 8 ची संधी!

T20 World Cup Matches Live Streaming : न्यूझीलंडसह झिम्बाब्वेसाठी Super 8 ची संधी!

ICC T20 World Cup 2026 New Zealand And  Zimbabwe Chance Super Eight Spots Day 11 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेतील १० व्या दिवसापर्यंत यंदाच्या हंगामातील सुपर ८ मधील पाच संघ निश्चित झाले आहेत. आता ११ व्या दिवशी न्यूझीलंडसहझिम्बाब्वेचा संघ सुपर ८ चं तिकीट मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ट्रिपल हेडरच्या लढतीत पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा यांच्यात सामना रंगणार आहे. त्यानंतर दुसऱ्या लढतीत झिम्बाब्वे आणि आयर्लंड हे संघ समोरासमोर असतील. मंगळवारी सायंकाळच्या लढतीत स्कॉटलंड विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना खेळवला जाणार असून हे दोन्ही संघ आधीच सुपर ८ च्या शर्यतीतून बाद झाल्यामुळे दोन्ही संघ स्पर्धेतील शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरतील. इथं एक नजर टाकुयात सुपर ८ चं समीकरण अधिक स्पष्ट करणारे NZ vs CAN आणि IRE vs ZIM यांच्यातील लढत कुठे आणि कधी रंगणार? हे सामने कसे पाहता येतील यासंदर्भातील सविस्तर माहिती....

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सुपर ८ साठी न्यूझीलंडसाठी  सोपा पेपर 

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या 'ड' गटातील न्यूझीलंड आणि कॅनडा साखळी फेरीतील आपला चौथा आणि अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतली. हा सामना जिंकून न्यूझीलंड ६ गुणासह सुपर ८ मधील तिकीट पक्के करेल. त्यांच्याविजयासह कॅनडासह अफगाणिस्तान. युएई आणि अफगाणिस्तानचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात येईल.   

  • न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा, टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील ३१ वा सामना 
  • सामन्याचे ठिकाण- एमए चिदंबरम, चेन्नई
  • सामन्याची वेळ- सकाळी ११ वाजता. 

झिम्बाब्वेच्या संघाला सुवर्ण संधी, मॅच जिंकली की, सुपर ८ मध्ये एन्ट्री 

श्रीलंकेच्या पल्लेकल स्टेडियमवर 'ब' गटातील आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळवण्यात येईल. झिम्बाब्वेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा उलटफेर केला होता. आता आयर्लंडविरुद्धची लढाई जिंकून ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आणत ते सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

  • आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे, टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील ३२ वा सामना
  • सामन्याचे ठिकाण, पल्लेकल स्टेडियम, पल्लेकल
  • सामन्याची वेळ- दुपारी ३ वाजता
     

नेपाळ शेवट गोड करण्यासाठी उतरेल मैदानात

'क' गटातील स्कॉटलंड आणि नेपाळ हे दोन्ही संघ स्पर्धेतून आउट झाले आहे. बांगलादेशच्या जागी संधी मिळालेल्या स्कॉटलंडच्या संघाने ३ पेकी १ सामना जिंकला आहे. दुसरीकडे नेपाळच्या संघाने इंग्लंडला कडवी झुंज दिली. पण हा सामना ४ धावांनी गमावल्यावर उर्वरित २ सामन्यातही त्यांच्या पदरी निराशा आली. अखेरचा सामना जिंकून ते खाते उघडून शेवट विजयासह करण्यासाठी मैदानात उतरतील.

  • स्कॉटलंड विरुद्ध नेपाळ, टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील ३३ वा सामना
  • सामन्याचे ठिकाण- वानखेडे स्टेडियम, मुंबई
  • सामन्याची वेळ- सायंकाळी ७ वाजता.

Web Title : टी20 वर्ल्ड कप: न्यूजीलैंड, जिम्बाब्वे की सुपर 8 पर नजर।

Web Summary : न्यूजीलैंड और जिम्बाब्वे आगामी मैचों में सुपर 8 के लिए क्वालीफाई करने का लक्ष्य बना रहे हैं। आज के टी20 विश्व कप मैचों में न्यूजीलैंड का मुकाबला कनाडा से, जिम्बाब्वे का आयरलैंड से और स्कॉटलैंड का नेपाल से होगा।

Web Title : T20 World Cup: New Zealand, Zimbabwe eye Super 8 spot.

Web Summary : New Zealand and Zimbabwe aim for Super 8 qualification in upcoming matches. New Zealand faces Canada, Zimbabwe plays Ireland, and Scotland meets Nepal in today's T20 World Cup matches.