इंग्लंडमध्ये गतवर्षी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर बेन स्टोक्सनं केलेल्या विधानावर राजकारण सुरू झाले आहे. इंग्लंडला पहिल्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात स्टोक्सनं सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या एका विधानावरून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तनं राजकारण करण्यास सुरूवात केली. त्यानं एक जुना व्हिडीओ पोस्ट करून भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरल्याचा आरोप केला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं त्यावर सडेतोड उत्तर दिले.
सिकंदरने ट्विट करून लिहिले की,''वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ मुद्दाम इंग्लंडकडून पराभूत झाला, असं बेन स्टोक्सनं त्याच्या पुस्तकात लिहिले आहे. पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यासाठी भारतानं ही खेळी केली. याची भविष्यवाणी मी आधीच केली होती.'' यावर बेन स्टोक्सनं रिट्विट करून लिहिले की,''असं लिहिलेलं तुम्हाला शोधून सापडणार नाही. मी असं कधी बोललोच नाही. याला शब्दांसोबत खेळणे असे म्हणातात.''
वर्ल्ड कप 2019मध्ये इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या पराभवावर स्टोक्स म्हणाला होता की,''रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची भागीदारी रहस्यमयी वाटते आणि महेंद्रसिंग धोनीनं जिंकण्याची जिद्द दाखवली नाही.'' स्टोक्सनं त्याच्या ऑन फायर या पुस्तकात लिहिलं की,''धोनी फलंदाजीला आला तेव्हा भारताला 11 षटकांत विजयासाठी 112 धावा हव्या होत्या. त्याही परिस्थितीत धोनी संयमानं खेळत होता. चेंडू सीमारेषा पार पाठवण्यापेक्षा तो एक-एक धाव घेण्यावर भर देत होता. भारतीय संघ अखेरच्या 12 चेंडूंत जिंकला असता.''
त्यानं अजून लिहिलं की,''धोनी आणि केदार जाधव यांच्या भागीदारीत जिंकण्याची जिद्द कमी दिसली. त्या दोघांनी आक्रमक फलंदाजी केली असती, तर धावांचा पाठलाग करता आला असता.'' त्या सामन्यात धोनी 31 चेंडूंत 42 धावा करून नाबाद राहिला.
टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!
भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी
सोशल अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल; पाकिस्तानी गोलंदाज ट्विटवर होतोय ट्रेंड!
हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज