Mumbai Star Labelled Rohit Sharmas Doppelganger Rohit Sharma Hardik Tamore Pic Viral : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसत आहे. ७ वर्षांनी या देशांतर्गत स्पर्धेत पुनरागन करताना त्याने दीडशतकी खेळीसह धमाकाही केला. त्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर तुफान गर्दीही केल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईच्या संघात दोन दोन रोहित!
रोहितच्या मैदानातील कामगिरीशिवाय त्याची खास झलक दाखवणारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यात सिक्कीम विरुद्धच्या पहिल्या सामन्यातील रोहित शर्माचा स्लिपमध्ये फिल्डिंग करतानाचा फोटो पाहून चाहते चक्रावले आहेत. कारण व्हायरल फोटोतील एकाच फ्रेममध्ये मुंबईच्या संघात दोन दोन रोहित असे पाहायला मिळते. काहींना तर दोन्ही फोटो रोहित शर्माचेच आहेत, असे वाटू शकते. पण ते तसं नाही. इथं जाणून घेऊयात कोण आहे व्हायरल फ्रेममधील दुसरा चेहरा जो सेम टू सेम रोहितसारखा दिसत आहे, त्यासंदर्भातील खरी गोष्ट
कोण आहे तो मुंबईचा स्टार? ज्याला चाहत्यांनी लावला हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' असल्याचा टॅग
सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे त्यात रोहित शर्माच्या शेजारी हुबेहुब त्याचा सारखे दिसणाऱ्या खेळाडूची झलक पाहायला मिळते. रोहित शर्मा स्लिपमध्ये फिल्डिंग करत असताना त्याच्या फ्रेममध्ये मुंबई संघाचा विकेट किपर बॅटर हार्दिक तमोरे (Hardik Tamore) ची छबी क्लिक झाली. या युवा विकेट किपर बॅटरचा चेहरापट्टी, दाढीतील लूक आणि हावभाव पाहून अनेक चाहत्यांनी त्याला रोहित शर्माचा ड्युप्लिकेट असा टॅग लावला. 'हा तर हुबेहुब रोहितच!', 'मुंबईच्या संघात दोन दोन रोहित' अशा प्रतिक्रिया या व्हायरल फोटोवर उमटताना दिसत आहेत. हार्दिक हा मूळचा ठाण्याचा असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबईच्या संघाकडून खेळतो. यष्टीमागील कामगिरीशिवाय उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या क्रिकेटरची बॅटिंग स्टाईलमध्येही रोहितची झलक पाहायला मिळते.