Mumbai indians Mitchell McClenaghan gets engaged to his long-time girlfriend Georgia England | मुंबई इंडियन्सचा खेळाडू अडकणार लग्नबंधनात; 'किसिंग'चा फोटोच केला शेअर

मुंबई इंडियन्सचा खेळाडू अडकणार लग्नबंधनात; 'किसिंग'चा फोटोच केला शेअर

मुंबई : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक जेतेपद नावावर केली. 2015च्या जेतेपदात सिंहाचा वाटा उचलणारा खेळाडू आता लग्नबंधनात अडकणार आहे. त्यानं सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत ही घोषणा केली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे, परंतु दोघांनीही लग्नाची तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू कोण?


न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज मिचेल मॅक्लेघन असे त्याचे नाव आहे. तो लवकरच प्रेयसी जॉर्जिया इंग्लंड हिच्याशी विवाह करणार आहे. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि अखेरीस त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेदरम्यान मॅक्लेघनला चिअर करण्यासाठी जॉर्जिया भारतात अनेकदा आली होती. या दोघांनी नुकताच साखरपुडा केला.


मॅक्लेघनने मुंबई इंडियन्सच्या जेतेपदाच्या वाटचालीत अनेकदा महत्त्वाची भूमिका वटवली आहे. 33 वर्षीय मॅक्लेघनने 48 वन डे आणि 29 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत किवी संघाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 82 व 30 विकेट्स घेतल्या आहेत. 2016 मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला आहे. त्याने 2015, 2017 आणि 2019 च्या मुंबई इंडियन्सच्या जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.  आयपीएलमध्ये त्याने 56 सामन्यांत 71 विकेट्स घेतल्या आहेत. 21 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

Web Title: Mumbai indians Mitchell McClenaghan gets engaged to his long-time girlfriend Georgia England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.