MS Dhoni's given retirement? will now become coach ... | निवृत्तीबाबत धोनीचे धक्कातंत्र? आता प्रशिक्षण देणार...
निवृत्तीबाबत धोनीचे धक्कातंत्र? आता प्रशिक्षण देणार...

मुंबई : महेंद्रसिंग हा नेहमीच धक्का देत असतो. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला होता. कर्णधारपद सांभाळत असतानाही धोनीने बरेच धक्के दिले आहेत. आता निवृत्तीबाबतही धोनी धक्कातंत्र वापरणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. धोनी आता मार्गदर्शन करणार असल्याचेही वृत्त आले आहे.

रांचीला गेल्या काही वर्षांमध्ये ओळख मिळवून दिली ती धोनीनेच. झारखंडकडून तो खेळायचा. त्यामुळे झारखंडसारखे छोटे राज्यही प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यामुळे झारखंडला अजून मोठे करण्याचा धोनीचा मानस असल्याचे समजत आहे. कारण काही दिवसांपूर्वी धोनी हा झारखंडच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार असल्याचे वृत्त आले होते.

धोनी आता निवृत्तीनंतर झारखंडचे प्रशिक्षकपद सांभाळणार, असे वृत्त होते. पण झारखंड क्रिकेट असोसिएशनने याबाबत कोणतही मत व्यक्त केलेले नाही. काही अधिकाऱ्यांनी तर ही गोष्ट नाकारली आहे. त्यामुळे धोनी खरंच झारखंडचे कर्णधारपद सांभाळणार का, याची जोरदार चर्चा सुरु आहे. पण या चर्चेला अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही.

रवी शास्त्रींचा पत्ता कट ! धोनीच्या भवितव्याबाबत गांगुलीने केली विराट आणि कोहलीशी चर्चा
मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचा विषय चांगलाच गाजत आहे. धोनीच्या भवितव्याबाबत गांगुलीने विधान केले आहे. त्याचबरोबर निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही धोनीच्या भवितव्याबाबत आपले मत मांडले आहे. पण गांगुलीने धोनीच्या भवितव्याबाबत कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. पण या चर्चेला गांगुलीने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मात्र बोलावले नसल्याचेही समजत आहे.

गांगुलीने कोहली आणि रोहित या दोघांना चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यावेळी निवड समितीही उपस्थित होती. भारतीय संघाचा भविष्याचा रोड मॅप काय असेल, याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याचबोरबर धोनीच्या भवितव्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आल्याचे समजत आहे.


विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत महेंद्रसिंग धोनीला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता धोनी मैदानात दिसणार की नाही, याबाबत बऱ्याच वावड्या उठत आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या भवितव्याबाबत एक मोठे विधान केले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनाकडे लक्ष लागले होते. पण, ट्वेंटी-20 संघात धोनीचं नाव नसल्यानं चाहते निराश झाले आहेत आणि पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धोनीनं टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली होती. त्याच्या उपस्थितीनं चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. पण धोनी आता असाच संघाबाहेर राहणार का, या चर्चांनाही उधाण आले होते.

एमएसके प्रसाद यांनी यावेळी सांगितले की, " विश्वचषकानंतर आमचे विचार स्पष्ट झाले आहेत. आम्ही युवा यष्टीरक्षकांना जास्त संधी देणार आहोत. धोनीच्या मनातही हीच गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही धोनीऐवजी युवा यष्टीरक्षकांना यापुढे पसंती देणार आहोत."

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर धोनीनं विश्रांती घेणं पसंत केले. सुरुवातीला त्यानं बीसीसीआयकडे दोन महिन्यांची विश्रांती मागितली होती, परंतु त्यात त्यानं नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे तो कमबॅक करेल की नाही, याची धाकधुक चाहत्यांच्या मनाला लागली आहे. तो जानेवारी महिन्यात कमबॅक करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ''झारखंड संघाच्या वरिष्ठ संघाशी त्यानं चर्चा केली होती, परंतु सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 चषक स्पर्धेसाठी वरिष्ठ संघ जाणार आहे. त्यामुळे धोनीला आता 23 वर्षांखालील झारखंड संघासोबत सराव करावा लागणार आहे,'' असे वृत्त इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे.

याच वृत्तानुसार धोनी पुढील वर्षी होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार आहे. त्यामुळेच त्यानं मर्यादित षटकांच्या सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. तो जानेवारी महिन्यात राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत वर्ल्ड कप होणार आहे. त्यादृष्टीनं धोनी सरावाला लागला आहे. त्यासाठी तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून तुफान फटकेबाजी करण्यासाठीही उत्सुक आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: MS Dhoni's given retirement? will now become coach ...

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.