IPL 2022: धोनीनं बनवली 'नवी टीम'! मेगा ऑक्शनमध्ये 'या' खेळाडूंवर खर्च करणार कोट्यवधी रुपये, असं ठेवतोय बारीक लक्ष

आयपीएलच्या २०२१ च्या मोसमाचा चॅम्पियन संघ ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाची गुणवान खेळाडू, जबरदस्त कर्णधार ही तर खासियत आहेच. पण ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 07:58 PM2021-11-22T19:58:42+5:302021-11-22T19:59:10+5:30

whatsapp join usJoin us
MS Dhoni watched the Syed Mushtaq Ali final csk may buy shahrukh khan and 2 other players in whopping price ipl 200 mega auction | IPL 2022: धोनीनं बनवली 'नवी टीम'! मेगा ऑक्शनमध्ये 'या' खेळाडूंवर खर्च करणार कोट्यवधी रुपये, असं ठेवतोय बारीक लक्ष

IPL 2022: धोनीनं बनवली 'नवी टीम'! मेगा ऑक्शनमध्ये 'या' खेळाडूंवर खर्च करणार कोट्यवधी रुपये, असं ठेवतोय बारीक लक्ष

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलच्या २०२१ च्या मोसमाचा चॅम्पियन संघ ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाची गुणवान खेळाडू, जबरदस्त कर्णधार ही तर खासियत आहेच. पण या संघाचं आणखी एक वैशिट्य आहे ते म्हणजे चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडे गुणवान खेळाडू ओळखण्याचं खूप चांगलं कसब आहे. संघ व्यवस्थापनाकडून भारतीय युवा खेळाडूंच्या स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीकडे चांगलं लक्ष ठेवलं जातं. यात कर्णधार धोनीचंही युवा खेळाडूंकडे बारीक लक्ष असतं. धोनी आपल्या संघात ज्या खेळाडूला संधी तो मैदानात उतरुन संधीचं सोनं करतो. ऋतूराज गायकवाड हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. 

चेन्नई सुपरकिंग्ज संघानं आता आयपीएल २०२२ साठी देखील तयारीला सुरुवात केली आहे. धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात धोनी टेलिव्हिजनवर सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा पाहात असल्याचं दिसून येत आहे. सय्यद मुश्ताक अली करंकड स्पर्धेच्या अंतिम फेरीत तामिळनाडू संघानं सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर कर्नाटकला मात दिली. तामिळनाडूच्या संघाला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती आणि शाहरुख खान यानं खणखणीत षटकार ठोकून संघाला जिंकवलं. 

धोनीनं टँलेंट ओळखलं आता बनणार जबरदस्त टीम
धोनीनं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा अंतिम सानना चेन्नईत पाहिला आणि याच दरम्यान धोनीनं नक्कीच काही खेळाडू हेरले असतील यात शंका नाही. दबावाच्या क्षणी खेळाडूंच्या कामगिरीची चाचपणी करुन धोनीनं प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेबाबत अंदाज घेतला असेल. त्यानुसार आगामी मेगा लिलावासाठी संघ कसा असावा यासाठीची तयारी केली असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार धोनीनं तीन खेळाडूंवर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून या खेळाडूंना संघात दाखल करुन घेण्यासाठी कोट्यवधींची बोली लागू शकते. 

आयपीएलच्या यंदाच्या मेगा लिलावात शाहरुख खानच्या लिलावाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं विशेष लक्ष असेल. तामिळनाडूच्या या खेळाडूनं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत १०१ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या मागील सीझनमध्ये शाहरुख खान एका सामन्यानंतर धोनीकडून टीप्स घेत असल्याचंही दिसून आलं होतं. धोनीनं बराच वेळ त्याच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे शाहरुख खानला संघात दाखल करुन घेण्यासाठी धोनी इच्छुक असू शकतो. 

मेगा लिलावात चेन्नई सुपरकिंग्जचं साई किशोर या खेळाडूकडेही लक्ष असेल. खरंतर गेल्या सीझनमध्ये देखील साई किशोर चेन्नईच्या ताफ्यात होता. पण त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. यावेळी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत साई किशोर यानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फिरकीपटू साई किशोर यानं स्पर्धेत १० विकेट्स घेतल्या आहेत. एका सामन्यात त्यानं चार षटकांमध्ये केवळ १२ धावा देऊन तीन विकेट्स मिळवल्या होत्या. 

युवा अष्टपैलू एम मोहम्मद याच्याकडेही चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं लक्ष असणार आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत एम मोहम्मद यानं सात विकेट्स मिळवल्या आणि १८२ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटनं धावा देखील केल्या आहेत. 

Web Title: MS Dhoni watched the Syed Mushtaq Ali final csk may buy shahrukh khan and 2 other players in whopping price ipl 200 mega auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.