धोनीचे प्रशिक्षक देवल सहाय यांचं निधन; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महेंद्रसिंह धोनीवर आधारित 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटात देखील देवल सहाय यांचा उल्लेख आहे.

By मोरेश्वर येरम | Updated: November 24, 2020 13:22 IST2020-11-24T13:21:39+5:302020-11-24T13:22:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
MS Dhoni mentor Deval Sahay passes away in Ranchi after prolonged illness | धोनीचे प्रशिक्षक देवल सहाय यांचं निधन; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

धोनीचे प्रशिक्षक देवल सहाय यांचं निधन; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ठळक मुद्देधोनीवरील आधारित 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातही सहाय यांचा उल्लेखदेवल सहाय यांच्या निधनाने रांची क्रिकेटवर शोककळाधोनीला घडविण्यात सहाय यांचं मोलाचं योगदान

रांची
बिहार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राहिलेले देवल सहाय यांचं आज निधन झालं आहे. ते ७३ वर्षांचे होते. रांची येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

रांची क्रिकेटचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे देवल सहाय हे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे प्रशिक्षक होते. क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये सर्वोत्तम खेळाडू राहिलेले देवल हे सेंट्रल कोलफील्डस लिमिटेड (सीसीएल) कंपनीत कर्मचारी संचालक पदावर कार्यरत होते. त्यानंतर २००६ साली निवृत्त झाल्यावर त्यांनी खेळ प्रशासनाचाही ताबा सोडला होता. त्यांच्या निधानामुळे झारखंड क्रिकेट असोसिएशनसह विविध संघटनांमधील खेळ प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. 

देवल सहाय यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये तयार केलेल्या पोषक वातावरणामुळे त्यांच्या नजरेखालून अनेक प्रतिभावान खेळाडू भारतीय संघाला मिळाले आहेत. यात महेंद्रसिंह धोनी, प्रदीप खन्ना, आदिल हुसैन, अन्वर मुस्तफा, धनंजय सिंह या खेळाडूंचा समावेश आहे. 

महेंद्रसिंह धोनीवर आधारित 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटात देखील देवल सहाय यांचा उल्लेख आहे. धोनीला क्रिकेट जगतात वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात सहाय यांचं महत्वाचं योगदान राहिलं आहे.

Web Title: MS Dhoni mentor Deval Sahay passes away in Ranchi after prolonged illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.