ms dhoni birthday celebration video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा ७ जुलै हा वाढदिवस. चाहत्यांमध्ये त्याच्या वाढदिवशी विशेष उत्साह दिसून येतो. महेंद्रसिंग धोनीची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या फार्म हाऊसबाहेर चाहत्यांची गर्दी असते. या दिवशी त्याच्या फार्म हाऊसबाहेर चाहते जास्तच गर्दी करताना दिसतात. कारण वाढदिवशी धोनी घराबाहेर येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांना धोनीची एक झलक पाहता येते. यंदा धोनीने आपला वाढदिवस खास लोकांसोबत साजरा केला. त्याने झारखंड क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत केक कापला.
झारखंड क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाढदिवस
सध्या धोनी रांचीतील दलादिली येथील त्याच्या फार्म हाऊसवर सुट्टी घालवत आहे. यादरम्यान त्याने त्याचा ४४ वा वाढदिवसही साजरा केला. त्याने झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (JSCA) स्टेडियममध्ये कर्मचाऱ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. या वेळी JSCAचे अध्यक्ष अजय नाथ शाहदेव देखील उपस्थित होते. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये केक कापल्यानंतर त्याने त्याच्या प्रशिक्षक मित्राला केक खायला दिला. त्यानंतर त्याने अध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांनाही केक भरवला आणि आनंद व्यक्त केला.
बाहेर पडण्याआधी स्वीकारले चाहत्यांचे अभिवादन
दरम्यान, आजही जेव्हा महेंद्रसिंग धोनी त्याच्या कारमधून बाहेर पडला, तेव्हा त्याने चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. अशा परिस्थितीत धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांमध्ये खूपच उत्साह दिसून आला.
धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळतोय...
महेंद्रसिंग धोनी अजूनही IPL खेळत आहे. त्याने २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला होता. पण, तो सतत आयपीएल खेळत आहे. २०२५ मध्ये माहीची चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच निराशाजनक होती. आता धोनी २०२६ मध्ये आयपीएल खेळेल की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. धोनीने २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. तो स्पर्धेचा उपांत्य सामना होता. त्यानंतर त्याने निवृत्ती स्वीकारली.
Web Title: ms dhoni birthday celebration video 44th birthday jsca staff members cut cake watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.