Mumbai Indians (MI) vs Lucknow Super Giants (LSG) IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये आज वानखेडेवर मुंबई इंडियन्स (MI) लखनौ सुपर जायंट्स (LSG) मध्ये सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने लखनौसमोर 215 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि रायन रिक्लटन या दोघांनी अर्धशतकीय कामगिरी केली, तर अखेरच्या काही ओव्हर्समध्ये नमन धिरनेही 11 चेंडूत 25 धावांची छोटी पण महत्वाची खेळी केली. आजच्या खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादव ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
नाणेफेक जिंकून लखनौने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची अतिशय खराब सुरुवात झाली. तिसऱ्याच षटकात मुंबईचा स्टार रोहित शर्माला लखनौच्या मयंक यादवने माघारी पाठवले. रोहितने 5 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने फक्त 12 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर रायन रिकल्टन आणि विल जॅक्सने दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान, रिकेलटनने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढे फिरकी गोलंदाज दिग्वेश सिंग राठीच्या चेंडूवर रिकल्टन 32 चेंडूत 58 धावा करुन बाद झाला.
रिकेल्टननंतर सूर्यकुमार आणि विल जॅक्समध्ये 28 धावांची भागीदारी झाली, मात्र लखनौच्या प्रिन्स यादवने विल जॅक्सला 29 धावांवर वाद केले. त्यानंतर तिलक वर्मादेखील फक्त 6 धावांवर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या चेंडूवर वाद जाला. कर्णधार हार्दिक पांड्याने निराशा केली. मयंक यादवने अवघ्या 5 धावांवर पांड्याला माघारी पाठवले. एका बाजूने विकेट पडत होत्या, तर दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने मुंबईला सावरले. सुर्याने 28 चेंडूत 54 धावांची दमदार खेळी केली. पुढे आवेश खानच्या चेंडूवर सूर्या झेलबाद झाला. शेवटी नमन धीर (25*) आणि डेब्यूटेंट कॉर्बिन बॉश (20) च्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मुंबईने लखनौसमोर 216 धावांचे आव्हान उभे केले.
Web Title: MI vs LSG IPL 2025: Suryakumar and Ryan storm, Naman Dhir also bat well; set a target of 216 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.