MI vs KXIP Latest News : Super over ended in tie; Two Super Overs in the same game | MI vs KXIP Latest News : मोहम्मद शमीचा भेदक मारा, Super Over मध्येही बरोबरी; Double Super Over

MI vs KXIP Latest News : मोहम्मद शमीचा भेदक मारा, Super Over मध्येही बरोबरी; Double Super Over

MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab) सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) रोखून सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये नेला.  

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  क्विटन डी'कॉकनं ४३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा  किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकांत धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या एका षटकात पोलार्ड व नॅथन कोल्टर नायर यांनी दोन षटकार व दोन चौकारांसह २२ धावा चोपून काढल्या.  या दोघांनी नाबाद ५७ धावांची भागीदारी केली. पोलार्डनं १२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ आणि कोल्टर-नायलनं १२ चेंडूंत २४ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात पंजाबला चौथ्या षटकांत मयांक अग्रवालच्य रुपानं पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी ४२ धावांची भागीदारी केली. गेल चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु राहुल चहरच्या फिरकीच्या जाळ्यात तो अडकला. गेल २४ धावा ( १ चौकार व २ षटकार) करून बाद झाला. निकोलस पुरननेही ताबडतोड खेळी केली, पण त्याचा अडथळा दूर करण्यासाठी रोहितनं बुमराहला बोलावलं आणि हा डाव यशस्वी ठरला. पूरन १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २४ धावांवर माघारी परतला. लोकेश राहुलनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ग्लेन मॅक्सवेलचा ( ०) अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. राहुल चहरनं त्याला बाद केले.

१८ व्या षटकात जसप्रीत बुमराहनं सामना फिरवला. त्यानं पंजाबचा अखेरचा आशास्थान असलेल्या लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. लोकेशनं ५१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावा केल्या. दीपक हुडाचा झेल सोडणं मुंबई इंडियन्सला महागात पडलं असतं. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी ९ धावांची गरज असताना ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर हुडाचा झेल सुटला. पण, पंजाबला १ धावेवर समाधान मानावे लागले. बोल्टनं पंजाबला ५ बाद १७६ अशा बरोबरीत रोखून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. 

सुपर ओव्हरचा थरार
जसप्रीत बुमराह गोलंदाजी

पहिल्या चेंडूवर लोकेश राहुलची एक धाव
दुसऱ्या चेंडूवर निकोलस पूरन झेलबाद
तिसऱ्या चेंडूवर लोकेश राहुलची एक धाव
चौथ्या चेंडूवर दीपक हुडाची एक धाव
पाचव्या चेंडूवर लोकेश राहुलच्या दोन धावा
सहाव्या चेंडूवर लोकेश राहुल बाद

मोहम्मद शमी गोलंदाजी
पहिल्या चेंडूवर क्विंटन डी'कॉकची एक धाव
दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माची एक धाव
तिसऱ्या चेंडूवर क्विंटन डी'कॉकची एक धाव
चौथ्या चेंडूवर शून्य धाव
पाचव्या चेंडूवर रोहित शर्माची एक धाव
सहाव्या चेंडूवर एक धाव अन् सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs KXIP Latest News : Super over ended in tie; Two Super Overs in the same game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.