MI vs KXIP Latest News : रोहित शर्माच्या विक्रमी कामगिरीवर मुंबई इंडियन्सनं चढवला विजयी कळस!

MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे एकतर्फी सामना झाला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 1, 2020 11:15 PM2020-10-01T23:15:10+5:302020-10-01T23:29:35+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KXIP Latest News : Mumbai Indians beat Kings XI Punjab by 48 runs | MI vs KXIP Latest News : रोहित शर्माच्या विक्रमी कामगिरीवर मुंबई इंडियन्सनं चढवला विजयी कळस!

MI vs KXIP Latest News : रोहित शर्माच्या विक्रमी कामगिरीवर मुंबई इंडियन्सनं चढवला विजयी कळस!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे एकतर्फी सामना झाला. रोहित शर्मा ( Rohit Sharma)नं दमदार खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात रोहितनं IPLमधील 5000 धावांचा विक्रम नावावर केला. त्यानंतर अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी दमदार फटकेबाजी करून मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारून दिली. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बजावल्यानंतर MIच्या गोलंदाजांनीही त्यांच्या खांद्यावरील भार सक्षमपणे पेलला अन् संघाला विजय मिळवून दिला. 

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित अन् इशान किशन ( Ishan Kishan) यांनी मुंबईचा डाव सावरला. इशान 23 धावांवर असताना रवी बिश्नोईनं त्याला जीवदान दिलं. त्यांची 62 धावांची भागीदारी 13व्या षटकात कृष्णप्पा गोवथमनं ( K. Gowtham) तोडली. इशान 28 धावांवर माघारी परतला.  रोहित 45 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 70 धावांवर माघारी परतला.  


हार्दिक पांड्याचं ( Hardik Pandya) वादळानं KXIPच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्याच्या साथीला पोलार्ड होताच.  त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं 4 बाद 191 धावा केल्या. हार्दिकनं 11 चेंडूंत नाबाद 30, तर पांड्यानं 20 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या. या दोघांनी 23 चेंडूंत नाबाद 67 धावा चोपल्या.  

धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण, पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) मयांकचा ( 25) त्रिफळा उडवला. त्यानंतर कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) करुण नायरला भोपळाही फोडू न देता त्रिफळाचीत केलं. KXIPचे दोन फलंदाज 39 धावांत माघारी पतले. राहुल चहरच्या ( Rahul Chahar) गोलंदाजीवर स्कूप मारण्याच्या नादात KL Rahulचा त्रिफळा उडाला. KXIPनं 10 षटकांत 3 बाद 72 धावा केल्या. मुंबई इंडियन्सपेक्षा या धावा अधिक होत्या, परंतु KXIPनं एक अतिरिक्त विकेट गमावली होती. 

ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करताना KXIPच्या आशा कायम राखल्या. जेम्स पॅटिन्सननं ही भागीदारी संपुष्टात आणली. पूरननं 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 44 धावा केल्या. KXIPचा अखेरचा आशास्थान मॅक्सवेलही उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन माघारी परतला. KXIPला 20 षटकांत 8 बाद 143 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सनं ( MI) हा सामना 48 धावांनी जिंकला. जसप्रीत बुमराहनं 18 धावांत दोन, राहुल चहरनं 26 धावांत दोन, जेम्स पॅटिसन्सनं 28 धावांत 2,  कृणाल पांड्यानं 27 धावांत 1 विकेट घेतली. ट्रेंट बोल्टनंही एक विकेट घेतली. 
 

Web Title: MI vs KXIP Latest News : Mumbai Indians beat Kings XI Punjab by 48 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.