MI vs KXIP Latest News : Did You Watch - Kieron Pollard+ Hardik Pandya Power hitting partnership? Video | MI vs KXIP Latest News : किरॉन पोलार्ड - हार्दिक पांड्या यांची 'Power Hitting' आतषबाजी; 23 चेंडूंत 67 धावा, Video

MI vs KXIP Latest News : किरॉन पोलार्ड - हार्दिक पांड्या यांची 'Power Hitting' आतषबाजी; 23 चेंडूंत 67 धावा, Video

MI vs KXIP Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात अबु धाबी येथे सामना रंगत आहे.  रोहित शर्मा ( Rohit Sharma)नं दमदार खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी दमदार फटकेबाजी करून मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारून दिली. MI vs KXIP Latest News & Live Score 

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित अन् इशान किशन ( Ishan Kishan) यांनी मुंबईचा डाव सावरला. इशान 23 धावांवर असताना रवी बिश्नोईनं त्याला जीवदान दिलं. त्यांची 62 धावांची भागीदारी 13व्या षटकात कृष्णप्पा गोवथमनं ( K. Gowtham) तोडली. इशान 28 धावांवर माघारी परतला.  रोहित 45 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 70 धावांवर माघारी परतला. MI vs KXIP Latest News & Live Score   

हार्दिक पांड्याचं ( Hardik Pandya) वादळानं KXIPच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्याच्या साथीला पोलार्ड होताच. हार्दिकनं 11 चेंडूंत नाबाद 30, तर पांड्यानं 20 चेंडूंत नाबाद 47 धावा केल्या. या दोघांनी अखेरच्या 23 चेंडूंत नाबाद 67 धावा कुटल्या.  MI vs KXIP Latest News & Live Score 

पाहा व्हिडीओ...


धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण, पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) मयांकचा ( 25) त्रिफळा उडवला. त्यानंतर कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) करुण नायरला भोपळाही फोडू न देता त्रिफळाचीत केलं. KXIPचे दोन फलंदाज 39 धावांत माघारी पतले. राहुल चहरच्या ( Rahul Chahar) गोलंदाजीवर स्कूप मारण्याच्या नादात KL Rahulचा त्रिफळा उडाला. KXIPनं 10 षटकांत 3 बाद 72 धावा केल्या. मुंबई इंडियन्सपेक्षा या धावा अधिक होत्या, परंतु KXIPनं एक अतिरिक्त विकेट गमावली होती. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs KXIP Latest News : Did You Watch - Kieron Pollard+ Hardik Pandya Power hitting partnership? Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.