MI vs KKR : मुंबई इंडिन्सचा सांघिक खेळ, KKRवर केली मात

MI vs KKR Latest News & Live Score : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)ने IPL 2020मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली.

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 06:37 PM2020-09-23T18:37:56+5:302020-09-23T23:49:23+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KKR Live Score Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2020 Live Score and Match updates | MI vs KKR : मुंबई इंडिन्सचा सांघिक खेळ, KKRवर केली मात

MI vs KKR : मुंबई इंडिन्सचा सांघिक खेळ, KKRवर केली मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) ने Indian Premier League ( IPL 2020) च्या सलामीच्या सामन्यातील CSKविरुद्धचा पराभव विसरून आज जो सांघिक खेळ केला, तो लाजवाब होता. रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना धु धु धुतले.  रोहित- सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यानंतर MIच्या गोलंदाजांनी खेळपट्टी व वातावरणाशी जुळवून घेत सुरेख गोलंदाजी केली. त्यात KKRने संघातील स्फोटक फलंदाजांना मागे राखण्याची चूक पुन्हा केली आणि त्यांच्या पराभवाला ती कुठेतरी कारणीभूत ठरली. 
 

MI vs KKR Latest News & Live Score

- मुंबई इंडियन्सच्या 5 बाद 195 धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सला 9 बाद 149 धावा करता आल्या

- पॅट कमिन्सनं 18व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चार षटकारांसह 27 धावा कुटल्या. 

- KKRला शंभर धावांचा पल्ला गाठण्यासाठी 15व्या षटकाची प्रतीक्षा पाहावी लागली. 16व्या षटकात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) ने KKRला धक्का देत रसेलचा त्रिफळा उडवला. त्याच षटकार मॉर्गनची विकेट घेत बुमराहनं MIचा विजय पक्का केला. 

Image

- मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चतूर माऱ्यासमोर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या बिग हिटर फलंदाजांनाही फटके मारता येत नव्हते. आंद्रे रसेल अनफिट असल्यासारखा दिसत होता. रसेल, मॉर्गन हे स्फोटक फलंदाज संघात असूनही नितिश राणाला आधी पाठवल्यानेही KKRवर टीका होत होती. आघाडीच्या फलंदाजांच्या संथ खेळीमुळे धावा व चेंडू यांच्यातले अंतर खूपच वाढले होते. 

- 150वा आयपीएल सामना खेळणाऱ्या किरॉन पोलार्डच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्यानं सीमारेषेवर सुरेख झेल टिपून नितिश राणाला ( 24) माघारी जाण्यास भाग पाडले. 

- कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांनी KKRच्या डावाला आधार दिला. ही डोईजड होऊ पाहणारी जोडी राहुल चहरनं ( Rahul Chahar) ने तोडली. त्यानं 11व्या षटकात कार्तिकला ( 30) पायचीत केले.

Image

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या KKRला मुंबईच्या गोलंदाजांनी इंगा दाखवला. जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी अचूक व भेदक मारा करताना KKRच्या फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. त्याच दडपणात शुबमन गिल आणि सुनील नरीन यांनी विकेट्स फेकल्या. 

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा Indian Premier League ( IPL 2020) च्या जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. CSKविरुद्धचा पराभव विसरून मुंबई इंडियन्सने आज जी फटकेबाजी केली ती लाजवाब होती. रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना हतबल केले. घरी बसून त्याच्या फकेबाजीचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येक चाहत्याला आपण स्टेडियममध्ये का नाही याची खंत नक्कीच वाटली असेल. रोहित- सूर्यकुमार यांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने मोठी धावसंख्या उभारता आली असती, परंतु अखेरच्या षटकात विकेट गमावल्यानं MI ला दोनशेपार जाता आले नाही. 
 

- रोहित आणि हार्दिक पांड्या यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीनं MIने मोठ्या धावसंख्येकडे कूच केली. पॅट कमिन्सला त्यांनी धु धु धुतले... पण, 18व्या षटकात रोहितचा झंझावात रोखण्यात KKRला यश आलं. शिवम मावीनं ( Shivam Mavi) रोहितला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केले. रोहितनं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून 80 धावा चोपल्या. 

- 11व्या षटकात रोहित-सुर्या यांची 90 धावांची भागीदारी तुटली. सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहितनं सूत्र हाती घेताना 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. यादव बाद झाल्यानंतर आलेल्या सौरभ तिवारीनंही तिसऱ्या विकेटसाठी रोहितसह 49 धावा जोडल्या. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर तो ( 21) झेलबाद होऊन माघारी परतला. 

रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम

किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल

- रोहितनं कुलदीप यादवच्या एकाच षटकात दोन षटकार खेचून IPLमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली. IPL मध्ये दोनशे षटकार मारणारा तो चौथा फलंदाज ठरला. ख्रिस गेल ( 326), एबी डिव्हिलियर्स ( 214) आणि महेंद्रसिंग धोनी ( 212) अव्वल तीन स्थानावर आहेत. सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांत तो 6व्या स्थानावर आहे. 

- 11व्या षटकात रोहित-सुर्या यांची 90 धावांची भागीदारी तुटली. सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहितनं सूत्र हाती घेताना 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचे हे 38वे अर्धशतक आहे. यासह त्यानं एबी डिव्हिलियर्सचा ( 37 अर्धशतक) विक्रम मोडला. सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर ( 48), विराट कोहली ( 41), सुरेश रैना ( 39) हे आघाडीवर आहेत.  

- IPL 2020 Auctionमधील सर्वात महागडा गोलंदाज पॅट कमिन्सच्या षटकात रोहितनं दोन खणखणीत Six मारले. रोहित-सुर्यानं अर्धशतकी भागीदारी करताना संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 59 धावा करून दिल्या.
 

- सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

Image

- मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MIच्या डावाला आकार दिला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहितनं मारलेला षटकार लाजवाब होता. 

किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

- शिवम मावीनं पहिलेच षटक निर्धाव टाकून क्विंटन डी कॉकला बाद केले.

Image

- Kolkata Knight Riders Playing XI: सुनील नरीन, नितीश राणा, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, दीनेश कार्तिक, एन नाईक, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, एस वॉरियर्स, एस मावी, शुबमन गिल

Image

- Mumbai Indinas Playing XI: रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सुर्यकूमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह

Image

- मुंबई इंडियन्सकडून 150 IPL सामना खेळणारा किरॉन पोलार्ड पहिलाच खेळाडू

 

Image

वेदर रिपोर्ट । तापमान ३८ डिग्री सेल्सियसपर्यंत राहील. वाºयाचा वेग २१ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.

पिच रिपोर्ट । खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल. त्यामुळे फलंदाज जोखीम पत्करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.

मजबूत बाजू
मुंबई । आकड्याचा विचार केला तर मुंबईची (२५ पैकी १९ विजय) बाजू सरस आहे.
केकेआर। मॅचविनर्सचा समावेश आहे. इयोन मोर्गन संघासोबत जुळल्यामुळे ताकद वाढली आहे.

कमजोर बाजू
मुंबई । यूएईमध्ये आतापर्यंत केलेल्या निराशाजनक कामगिरीतून हा संघ सावरलेला नाही.
केकेआर । संघाने अद्याप पहिली लढत खेळलेली नाही, पण दिनेश कार्तिकच्या कर्णधारपदावर मात्र प्रश्न उपस्थित करण्यात येऊशकतो.
 

 

Web Title: MI vs KKR Live Score Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.