MI vs KKR Latest News : इयॉन मॉर्गन-पॅट कमिन्सनं KKRला सावरलं, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दमवलं

MI vs KKR Latest News :  आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं संघात दोन बदल केले आहेत. टॉम बँटन आणि कमलेश नागरकोटी यांच्या जागी अंतिम ११मध्ये ख्रिस ग्रीन व शिवम मावी यांना संधी दिली आहे, तर मुंबई इंडियन्सच्या संघात जेम्स पॅटिन्ससनच्या जागी नॅथन कोल्टर-नायल याची एन्ट्री झाली.  

By स्वदेश घाणेकर | Published: October 16, 2020 09:06 PM2020-10-16T21:06:55+5:302020-10-16T21:14:12+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KKR Latest News: Pat Cummins 53*(36) & Eoin Morgan 39*(29) added unbeaten 87 runs partnership, KKR 148/5 | MI vs KKR Latest News : इयॉन मॉर्गन-पॅट कमिन्सनं KKRला सावरलं, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दमवलं

MI vs KKR Latest News : इयॉन मॉर्गन-पॅट कमिन्सनं KKRला सावरलं, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दमवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs KKR Latest News : Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या मोसमातील प्ले ऑफच्या चौथ्या स्थानाच्या जवळ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) सामना करण्यापूर्वी कर्णधार बदलण्याचा डाव खेळला. दिनेश कार्तिकनं ( Dinesh Karthik) फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी KKRच्या नेतृत्वाची जबाबदारी इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याच्याकडे सोपवली. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली पहिलाच सामना खेळणाऱ्या KKRचा निम्मा संघ ६१ धावांत माघारी पाठवून MIनं सामन्यावर मजबूत पकड घेतली. पण, नवनियुक्त कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी KKRचा डाव सावरला अन् समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. पण, दोघांची १८ धावांची भागीदारी ट्रेंट बोल्टनं संपुष्टात आणली. पॉईंटवर उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Surykumar yadav) स्टनर कॅच घेतला. बोल्टची ही IPLमधील ५०वी विकेट ठरली. पण, कौतुक मात्र यादवचं झालं. नितिश राणाही ( ५) धावांवर कोल्टर नायलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. संकटात सापडलेल्या KKRचा पाय राहुल चहरनं ( Rahul Chahar)  आणखी खोलात टाकला. त्यानं शुबमन गिल आणि दिनेश कार्तिक यांना सलग दोन चेंडूंत बाद केले. किरॉन पोलार्डनं MIच्या गोलंदाजाची हॅटट्रिक होऊ दिली नाही. आंद्रे रसेलला आज मोठी खेळी करण्याची संधी होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही होता, परंतु जसप्रीत बुमराहनं चतुराईनं त्याला ( १२) बाद केलं.

नवनियुक्त कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी KKRच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना KKRला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पॅट कमिन्सला मिळालेलं जीवदान MIसाठी महागात पडले. कमिन्सनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. ५ बाद ६१ अशा संकटात सापडलेल्या KKRला कमिन्स-मॉर्गन जोडीनं बाहेर काढलं. KKRनं २० षटकांत ५ बाद १४८ धावा केल्या. कमिन्स ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननंही २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या. 

दिनेश कार्तिकनं कर्णधारपद का सोडलं?
''दिनेश कार्तिकनं कर्णधारपदावरून पाय उतार होण्याची इच्छा काल व्यक्त केली आणि त्याला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. हा संघासाठी सर्वोत्तम पर्याय असेल, असे त्याला वाटते. तो निस्वार्थी आहे आणि त्यासाठी खूप धाडस लागते. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व माझ्या खांद्यावर सोपवल्याचा आनंद आहे. आता स्पर्धेचा मध्यांतर आला आहे. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेल्या संघातील ड्रेसिंग रुममध्ये अधिक नेतृत्वगुण असलेले खेळाडू असणे कधीही चांगले. आमच्याकडे असे भरपूर खेळाडू आहेत. आजच्या सामन्यात आम्ही काही प्रयोग करणार आहोत. डेथ बॅटिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी हे प्रयोग असतील. आशा करतो की ते यशस्वी होतील,'' असे मॉर्गननं म्हटलं.
 

Web Title: MI vs KKR Latest News: Pat Cummins 53*(36) & Eoin Morgan 39*(29) added unbeaten 87 runs partnership, KKR 148/5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.