जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या विरुद्धच्या सामन्यात एकतर्फी विजयासह प्लेऑफ्समधील अव्वल दोनमधील आपलं स्थान निश्चित केले आहे. ११ वर्षानंतर प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणाऱ्या पंजाबच्या संघ Qualifier 1 मध्ये खेळणार हे या सामन्याच्या निकालानं फिक्स झाले आहे. दुसरीकडे या सामन्यातील पराभवामुळे पहिल्या दोनमध्ये पोहचण्याची मुंबई इंडियन्सची संधी हुकली आहे. आता मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ्सच्यालढतीत एलिमिनेटरचा सामना खेळताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्याच्या अर्धशतकाला पंजाबकडून दोन अर्धशतकासह कडक रिप्लाय; कॅप्टन अय्यरनं सिक्सर मारत संपवली मॅच
पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सूर्यकुमार यादवनं अर्धशतक झळकावले. पण त्याला अन्य कोणत्याही फलंदाजाने म्हणावी तशी साथ दिली नाही. परिणामी निर्धारित २० षटकात मुंबई इंडियन्सच्या संघाला १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या संघाने प्रभसिमरन सिंगच्या रुपात पहिली विकेट स्वस्तात गमावली. पण जॉश इंग्लिस आणि प्रियांश आर्य जोडी जमली. दोघांनी अर्धशतकासह सामना सेट केला. ही दोघे आपले काम करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरनं षटकार मारत संघाला ७ विकेट्स आणि ९ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
बुमराह अन् सँटनर वगळता MI कडून एकही गोलंदाज नाही चालला
मुंबई इडियन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रियंश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या जोडीनं पंजाबच्या डावाची सुरुवात केली. संघाच्या धाव फलकावर ३४ धावा असताना प्रभसिमरन सिंग १६ चेंडूत १३ धावा करून तंबूत परतला. बुमराहनं संघाला पहिली विकेट मिळवून दिली. पण त्यानंतर जॉश इंग्लिस आणि प्रियंश आर्य जोडीनं मुंबईकर गोलंदाजांचे अक्षरश: खांदे पाडले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची दमदार भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया भक्कम केला. प्रियंश आर्य ३५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला जॉश इंग्लिस याने ४२ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ७३ धावा केल्या. श्रेयस अय्यरनं १६ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार मारत २६ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या नेहल वढेरा २ धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह आणि मिचेल सँटनर वगळता एकाही गोलंदाजाला धमक दाखवता आली नाही.
Web Title: MI missed a big opportunity and crashed out in the Eliminator! PBKS secured a ticket to Qualifier 1 with a one-sided win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.