कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटपटूंना घरीच रहावे लागत आहे. त्यात खेळाडू घरीच व्यायाम करून स्वतःला तंदुरूस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या यांनी सोशल मीडियावर कसरतीचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याचीही भर पडली आहे आणि त्यानं त्याचा वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरून मात्र कोहलीनं त्याची मस्करी केली. आता भज्जीनं त्याचं उत्तर देताना टीम इंडियाच्या कर्णधाराला चॅलेंज दिले आहे.
हरभजनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तो डंबल्स हातात घेऊन व्यायाम करत आहे. आयपीएलसाठी भज्जी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
भज्जीच्या या व्हिडीओवर कोहलीनं पोस्ट लिहिली की,''वेल डन पाजी... तुझी बिल्डींग थोडी थोडी हलत आहे.'' कोहलीच्या या पोस्टवर भज्जीनंही उत्तर दिलं. तो म्हणाला, हळुहळू यात सुधारणा होईल. लॉकडाऊन संपण्याची वाट बघ आणि त्यानंतर सोबत एक सेशल करू.
![]()
टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!
भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी
सोशल अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल; पाकिस्तानी गोलंदाज ट्विटवर होतोय ट्रेंड!