'महिंद्रां'चा मास्टरस्ट्रोक; ऑस्ट्रेलियाविरूद्ध डेब्यू करणाऱ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर खुलवला 'आनंद'

गाबाच्या मैदानात भारतीय संघानं मिळवला होता ऐतिहासिक विजय

By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 03:04 PM2021-01-23T15:04:33+5:302021-01-23T15:08:00+5:30

whatsapp join usJoin us
mahindra and mahindra Anand Mahindra Announces Thar SUV as Gifts for Six Team India Youngsters After Historic Series Win in Australia | 'महिंद्रां'चा मास्टरस्ट्रोक; ऑस्ट्रेलियाविरूद्ध डेब्यू करणाऱ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर खुलवला 'आनंद'

'महिंद्रां'चा मास्टरस्ट्रोक; ऑस्ट्रेलियाविरूद्ध डेब्यू करणाऱ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर खुलवला 'आनंद'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देगाबाच्या मैदानात भारतीय संघानं मिळवला होता ऐतिहासिक विजयमहिंद्रांनी केली थार एसयूव्ही गिफ्ट करण्याची घोषणा

भारतानं ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. काही सीनिअर खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला धुळ चारली. यानंतर भारतीय संघ भारतात परतल्यानंतर संघातील सर्वच खेळाडूंचं जंगी स्वागतही करण्यात आलं. महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हेदेखील भारतीय संघाच्या या विजयावर अतिशय खुष आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत पदार्पण करणाऱ्या सहा खेळाडूंना महिंद्राची नवी SUV थार गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत ही माहिती दिली. 

एकीकडे भारतीय संघाच्या खेळाडूंना या ऐतिहासिक विजयानंतर जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा यांनी या खेळाडूंना एसयूव्ही भेट म्हणून देत नव्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या सहा खेळाडूंना आनंद महिंद्रांकडून भेट मिळणार आहे. 



गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत पराभव बघितलेला नव्हता. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकले, अशा प्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडने जबरदस्त हादरा दिला आणि कांगारूंना चारीमुंड्या चीत केले. अनुभवी आणि दिग्गज खेळाडू जखमी असताना नवख्या चहेऱ्यांनी जिद्दीनं खेळ करत ऑस्ट्रेलियाचे ‘गर्वाचे घर खाली’ केले.

क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली.

७० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला 

भारताने ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. गाबा मैदानावर आतापर्यंत २५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आले नव्हते. १९५१ मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे २३६ धावांचे लक्ष्य गाठले होते. मात्र, भारतीय संघाने ऐतिहासिक विजयासह वेस्ट इंडिजचा ७० वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.

Web Title: mahindra and mahindra Anand Mahindra Announces Thar SUV as Gifts for Six Team India Youngsters After Historic Series Win in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.