Look at the catch of Super girl Harmanpreet kaur of India | बाबो! ही कॅच नाही पाहिली तर काहीच नाही पाहिलं; पाहा भारताच्या या सुपरगर्लचा पराक्रम

बाबो! ही कॅच नाही पाहिली तर काहीच नाही पाहिलं; पाहा भारताच्या या सुपरगर्लचा पराक्रम

मुंबई : सध्याच्या घडीला एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या एका सुपरगर्लने सीमारेषेवर उडी मारून भन्नाट कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताच्या महिलांचा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका धावेने पराभव स्वीकारावा लागला होता. पण या सामन्याच्या निकालापेक्षा ही कॅच चांगलीच गाजत आहे.

या सामन्यात भारताची क्रिकेटॉपटू हरमनप्रीत कौरने सीमारेषेवर हवेत उडी मारून एका हाताने कॅच घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या भन्नाट कॅचचा व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Look at the catch of Super girl Harmanpreet kaur of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.