Lasith Malinga takes u turn on retirement | निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने घेतला 'यू टर्न'

निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने घेतला 'यू टर्न'

मुंबई : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने आपल्या निवृत्तीबाबत 'यू टर्न' घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आपण ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर निवृत्त होणार नाही, अशी भूमिका मलिंगाने घेतली आहे.

आपण विश्वचषकानंतर क्रिकेटला अलविदा करणार, असे मलिंगाने काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते. पण आता मात्र मलिंगाने आपला विचार बदलला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतरही आपण खेळणार असल्याचे मलिंगाने सांगितले आहे. यापुढे अजून वर्षे तरी खेळण्याचा मलिंगाचा मानस असल्याचे समजते.

वर्ल्ड कपनंतर मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, विश्वविक्रमाला मुकणार!
मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सामना करण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा प्रमुख गोलंदाज मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांत खेळता येणार नाही. श्रीलंकेच्या या दिग्गज गोलंदाजाला राष्ट्रीय कर्तव्यावर परतावे लागणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना श्रीलंकेच्या निवड समितीनं त्याला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे. 

गतवर्षी मलिंगा मुंबई इंडियन्सच्या साहाय्यक खेळाडूंच्या चमूत होता, परंतु लिलावात मुंबईने त्याला स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून 2 कोटी रुपयांत संघात दाखल करून घेतले. सध्या तो श्रीलंकेच्या वन डे संघाचे कर्णधारपद भूषवित आहे आणि स्थानिक वन डे स्पर्धेत तो गॅल संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ही स्पर्धा 4 ते 11 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यामुळे मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांना मुकावे लागणार आहे. 26 मार्चला तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होईल. सध्या मलिंका श्रीलंकेच्या संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 

''आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद होता. परंतु, वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता त्यांनी मला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले. त्यामुळे मीही होकार कळवला आणि मंडळालाच आयपीएल व मुंबई इंडियन्सला याबाबत कळवण्याची विनंती केली. आयपीएलमधून काही पैसे कमावता येणार नसले तर देशासाठी काहीतरी करता येईल, याचा आनंद आहे." 

Image result for malinga

श्रीलंकेच्या वन डे संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेनंतरच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातील पराभवानंतर मलिंगाने ही घोषणा केली. तो म्हणाला,''वर्ल्ड कपनंतर माझी कारकिर्द संपुष्टात येणार आहे. मला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि त्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईन.'' 

शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात रिधा हेंड्रीक्सला बाद करून मलिंगाने ट्वेंटी-20मधील 97वा बळी टिपला. या प्रकारात सर्वाधिक 98 विकेट घेणाऱ्या पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडण्यासाठी मलिंगाला केवळ एका विकेटची गरज आहे. मलिंगाने आपले सर्व लक्ष इंडियन प्रीमिअर लीगकडे ( आयपीएल 2019) वळवले आहे. पण, त्याला आयपीएलमध्येही पहिल्या सहा सामन्यांत खेळता येणार नाही. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lasith Malinga takes u turn on retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.