काही दिवसांपूर्वीच भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने गुपचूप साखरपुडा उरकला होता. बालपणीच्या मैत्रिणीसोबत त्याने साखरपुडा केला होता. याचे फोटोही त्यानेच इन्स्टावर पोस्ट केले होते. अचानक आज त्याने ते डिलीटही केले आहेत. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
कुलदीपच्या होणाऱ्या पत्नीचे वंशिका असे नाव आहे. ती कानपूरच्या एलआयसी कार्यालयामध्ये काम करते. कुलदीपच्या साखरपुड्याला रिंकू सिंह सह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती.
कुलदीपने हे फोटो का डिलीट केले याचे कारण समजलेले नाही. यामुळे कुलदीपचे चाहते हैराण झाले आहेत. कुलदीप सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. तिथे २० जूनपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. कुलदीप यादवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याचे लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. ४ जूनला त्यांचा साखरपुडा झाला होता.
वंशिका आणि कुलदीप यादव हे बालपणीचे मित्र आहेत. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आहे. लग्नाची तारीख अजून समोर आलेली नाही. परंतू, अचानक कुलदीपने हे फोटो डिलीट केल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
लेफ्टआर्म रिस्ट स्पिनरला चायनामनचा टॅग कसा लागला?
क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात जवळपास ३० गोलंदाजांनी या गोलंदाजी शैलीसह खास छाप सोडली आहे. ब्रॅड हॉग आणि पॉल एडम्स यासारख्या नावांसह कुलदीप यादवचा यात समावेश आहे. आता कुलदीप पुरुष क्रिकेटमध्ये भारताचा पहिला लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर आहे. ज्या चीनचा क्रिकेटमध्ये प्रभावच नाही, त्यांचा टॅग फिरकीपटूला चिकटण्यामागे एक खास इतिहास आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर डावखुऱ्या हाताने मनगटाच्या जोरावर चेंडू वळवण्याची क्षमता असणाऱ्या गोलंदाजाला 'चायनामन' असे संबोधले जाते. उजव्या हाताचा लेग स्पिनरचा चेंडू पडल्यावर फलंदाजापासून बाहेरच्या बाजूला वळवतो. या उलट डाव्या हाताच्या लेग स्पिनरचा चेंडू फलंदाजाच्या दिशेने वळतो. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये चीनला धमक दाखवता आलेली नसली तरी. डावखुऱ्या हाताने मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणारा (लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर) हा चीनचा होता. एलिस अचोंग असं या गोलंदाजाचे नाव. १९३३ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघानं या चीनी वशांच्या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले होते. इंग्लंडचा दिग्गज वॉल्टर रॉबिन्स हा वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील चीनी वंशाच्या गोलंदाजाच्या फिरकीवर फसला. चीन गोलंदाज अजब गजब प्रकारे गोलंदाजी करतोय असं म्हणत त्याने पॅव्हॅलियनचा रस्ता धरला. अन् या गोलंदाजी शैली 'चायनामन' नावाने लोकप्रिय झाली.
Web Title: Kuldeep Yadav suddenly deletes engagement photos with Vanshika; sparks mixed reactions...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.