Kohli's Dhoni, who is the best captain? Jasprit Bumrah picks the better Indian captain | कोहली की धोनी, कोण सर्वोत्तम कर्णधार? जसप्रीत बुमराहनं सांगितली 'मन की बात'
कोहली की धोनी, कोण सर्वोत्तम कर्णधार? जसप्रीत बुमराहनं सांगितली 'मन की बात'

मुंबई : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा की दीपिका पदुकोण यांच्यामध्ये जास्त हॉट कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर बुमराहने सुवर्णमध्य काढून स्वतःचा बचाव करून घेतला. एका यु-ट्युब वाहिनीसाठी ही मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी बुमराला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच मुलाखतीत बुमराहला आणखी एक प्रश्न विचारला गेला आणि यावेळी त्याने पळ न काढता मन की बात सांगितली.  

बुमराहनं अल्पावधीतच भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. तो संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये त्यानं आघाडीचं स्थानही पटकावलं आहे. जानेवारी 2016मध्ये बुमराहनं आंतरराष्ट्रीय वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2018मध्ये त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पण, या तीन वर्षांच्या काळात बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. 25 वर्षीय गोलंदाजाने 12 कसोटीत 62, 58 वन डेत 103 आणि 42 ट्वेंटी-20 सामन्यांत 51 विकेट्स घेतल्या आहेत.

यु-ट्युब वाहिनीवरील मुलाखतीत जेव्हा बुमराहाला विराट कोहली की महेंद्रसिंग धोनी यांच्यापैकी सर्वोत्तम कर्णधार कोण असे विचारण्यात आले, त्यावेळी तो म्हणाला,''हा खूप आव्हानात्मक प्रश्न आहे. पण, माझ्यासाठी धोनी हा सर्वोत्तम कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.''  

अनुष्का की दीपिका, कोण जास्त हॉट... या प्रश्नावर जसप्रीत बुमराने दिलं 'हे' उत्तर
अनुष्का शर्मा की दीपिका पदुकोण यांच्यामध्ये जास्त हॉट कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. सुरुवातीला बुमरा या प्रश्नावर काहीच बोलला नाही. पण मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने पुन्हा हाच प्रश्न विचारला. त्यावेळी बुमरा धर्मसंकटात सापडला होता. त्यानंतर त्याला विचारण्यात आले, अनुष्का कोण आहे, हे तुला माहितीच असेल? हे सांगितल्यावर बुमरावरील दडपण वाढेलेले पाहायला मिळाले. पण बुमराने या प्रश्नामधून आपली सुटका करून घेतली. बुमरा म्हणाला की, तुम्ही दिलेले पर्याय सुरक्षित नाहीत. बुमरा या प्रश्नातून सहीसलामत बाहेर पडला. त्यानंतर त्याला आलिया भट किंवा परिणीती चोप्रा यांच्यामध्ये कोण हॉट वाटते, हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बुमरा म्हणाला की, " मी आलियाचे काही फोटो आणि सिनेमे पाहिले आहेत."


Web Title: Kohli's Dhoni, who is the best captain? Jasprit Bumrah picks the better Indian captain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.