बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवल्यावर सौरव गांगुली विराट कोहलीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...

गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यावर त्याने विराट कोहलीकडून भारताचे कर्णधारपद काढून घ्यावे, अशी अजब मागणी होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 05:14 PM2019-10-16T17:14:20+5:302019-10-16T17:15:07+5:30

whatsapp join usJoin us
Know what sourav Ganguly said about Virat Kohli after getting the BCCI presidency ... | बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवल्यावर सौरव गांगुली विराट कोहलीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...

बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळवल्यावर सौरव गांगुली विराट कोहलीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. कारण गांगुलीच्या विरोधात अध्यक्षपदासाठी कोणीही नसेल. आता आपण अध्यक्ष होणार, हे समजल्यावर गांगुलीने भारताचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक विधान केले आहे.

गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होणार, हे समजल्यावर बॉलीवूडच्या एका सेलिब्रेटीने कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकावे, असे विधान केले होते. पण हे अधिकार गांगुलीला नसेल तरी तो याबाबतीत काही गोष्टी करू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण गांगुली आणि भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यामध्ये विस्तवही जात नाही. शास्त्री यांचा कोहली लाडका आहे, त्यामुळे कोहलीवरगाज पडू शकते, असे काही जाणकार म्हणत आहेत.

कोहलीबाबत गांगुली म्हणाला की, " गेल्या काही वर्षांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. पण भारताला मोठ्या स्पर्धांच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. याबाबत संघाचे प्रशिक्षण आणि कर्णधार यांनी विचार करायला हवा. कोहली हा एक चांगला फलंदाज आहे. त्याने ट्वेन्टी-20 विश्वचषकात बिनधास्त फलंदाजी करायला हवी."


'गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर विराट कोहलीचे कर्णधार काढावे'
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. पण गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यावर त्याने विराट कोहलीकडून भारताचे कर्णधारपद काढून घ्यावे, अशी अजब मागणी होताना दिसत आहे.

बॉलीवूडमधील कलाकार रशिद खानने गांगुलीकडे कोहलीला कर्णधारपदावरून काढण्याची मागणी केली आहे. रशिदने ट्विटरवर लिहिले होते की, " मी बऱ्याच काळापासून क्रिकेट पाहत नाही. कारण सध्या क्रिकेटमध्ये फिक्सिंग सुरु आहे. सौरव गांगुलींनी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर विराट कोहलीचे कर्णधारपद काढायला हवे. विराटला कर्णधारपदावरून काढल्यानंतर मी पुन्हा क्रिकेट पाहायला सुरुवात करेन."

 

सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बसवण्यात 'या' मोठ्या नेत्याचा हात
मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान होणार आहे. बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. पण एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. पण या बऱ्याच कालावधीमध्ये काही घडना पडद्यामागेही घडत होत्या. बीसीसीआयचा अध्यक्ष हा बिनविरोध निवडून यावा, यासाठी बरीच खलबतं सुरु होती. पण यावेळी एक मोठे भाजपाचे नेते यावेळी पडद्यामागून सूत्र हलवत असल्याचे समजते.

बीसीसआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना ब्रिजेश पटेल यांना अध्यक्षपदावर विराजमान करायचे होते. त्यांच्यासमोर बीसीसीआयचे माजी पदाधिकारी अनुराग ठाकूर यांचे कडवे आव्हान होते. पण यावेळी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपले वजन वापरल्याचे म्हटले जात आहे. अमित शहा यांच्या म्हणण्यानंतर गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्यात आले, असे म्हटले जात आहे. नॅशनल हेराल्ड या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.

Web Title: Know what sourav Ganguly said about Virat Kohli after getting the BCCI presidency ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.