अथिया शेट्टीच्या 'स्विमसूट' घातलेल्या फोटोवर लोकेश राहुलनं केलेल्या कमेंटनं चाहते चक्रावले 

भारतीय संघाचा फलंदाज लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्यातलं प्रेम काही लपून राहिलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 16:11 IST2020-08-20T16:04:09+5:302020-08-20T16:11:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
KL Rahul's Comment On Athiya Shetty's Swimwear Pic Has Instagram Abuzz | अथिया शेट्टीच्या 'स्विमसूट' घातलेल्या फोटोवर लोकेश राहुलनं केलेल्या कमेंटनं चाहते चक्रावले 

अथिया शेट्टीच्या 'स्विमसूट' घातलेल्या फोटोवर लोकेश राहुलनं केलेल्या कमेंटनं चाहते चक्रावले 

भारतीय संघाचा फलंदाज लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्यातलं प्रेम काही लपून राहिलेलं नाही. या दोघांना अनेकवेळा सोबत पाहिलं गेलं. शिवाय ही दोघं एकमेकांच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स-कमेंट्स करत असतात. अभिनेत्री अथियानं इंस्टाग्रामवर एक स्विमवियर घातलेला फोटो पोस्ट केला. त्या फोटोत अथिया सुंदर दिसतेय, पण राहुलनं त्यावर केलेल्या कमेंटमुळे चाहते चक्रावले आहेत.  

महेंद्रसिंग धोनीकडून 'या' तीन गोष्टी शिकण्यासारख्या; आनंद महिंद्रा यांचं मोजक्या शब्दात कौतुक

CPL 2020 : पाकिस्तानी फलंदाजाला 'इंग्रजी' येईना, नेपाळचा गोलंदाज धावला मदतीला, Video 

विनम्रता, साधेपणा, हार-जीत, हेअरस्टाईल; पंतप्रधान मोदींचं धोनीला खास पत्र

अथियाच्या फोटोवर राहुलनं एक कमेंट लिहिली आहे, त्यात त्यानं 'Jefa' असे लिहिले आहे. याचा अर्थ नक्की काय हे, चाहत्यांना कळेनासे झाले.  


हा स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा अर्थ बॉस असा होतो. आयपीएलसाठी लोकेश राहुल किंग्स इलेव्हन पंजाबच्या सहकाऱ्यांसोबत दुबईला रवाना झाला आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर पुन्हा मैदानावर परतण्यासाठी राहुल उत्सुक आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर त्यानं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 221 धावा आणि वन डे मालिकेत 204 धावा केल्या होत्या.  

Web Title: KL Rahul's Comment On Athiya Shetty's Swimwear Pic Has Instagram Abuzz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.