Video : भारतातील कोरोनाच्या भयाण परिस्थितीबाबत सांगताना रडू लागला KKRचा फलंदाज

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं तयार केलेला बायो-बबलही भेदला अन् एकामागून एक खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:47 AM2021-05-25T10:47:05+5:302021-05-25T10:48:51+5:30

whatsapp join usJoin us
KKR’s Tim Seifert breaks down while sharing his experience after contracting COVID-19 during IPL 2021 | Video : भारतातील कोरोनाच्या भयाण परिस्थितीबाबत सांगताना रडू लागला KKRचा फलंदाज

Video : भारतातील कोरोनाच्या भयाण परिस्थितीबाबत सांगताना रडू लागला KKRचा फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं तयार केलेला बायो-बबलही भेदला अन् एकामागून एक खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्थी, संदीप वॉर्यर्स, प्रसिद्ध कृष्णा व टीम सेईफर्ट, चेन्नई सुपर किंग्सचे मायकेल हस्सी व लक्ष्मीपती बालाजी, दिल्ली कॅपिटल्सचे अमित मिश्रा, सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही सर्व कोरोनावर मात करून आपापल्या घरी गेले आहेत. KKRचा फलंदाज टीम सेईफर्ट यानं त्याचा कोरोना काळातील अनुभव सांगितला आणि यावेळी तो ढसाढसा रडला. ( Kolkata Knight Riders’ Tim Seifert broke into tears) 

''चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजरनं मला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. माझ्यासाठी जणू जगच थांबले आणि आता पुढे काय याबाबत मला काहीच कळत नव्हते. आयुष्यातील तो सर्वात भीतीदायक क्षण होता. तुम्ही या वाईट संकटाबद्दल ऐकत असता आणि तेच संकट तुमच्या आयुष्यात येतं,''असे टीम सेईफर्ट सांगत होता. सेईफर्ट सध्या न्यूझीलंडमध्ये १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे आणि ऑनलाईन मुलाखतीत त्यानं हा अनुभव सांगितला.  पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!

सर्व सहकारी आपापल्या घरी गेले आणि मी चेन्नईत १० दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये होतो, हा विचार करूनच तणाव वाढत होता. त्यात रोज मीडियात हजारो लोकांच्या निधनाच्या बातम्या ऐकून मन घाबरलं होतं, असेही तो म्हणाला. ''ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या बातम्या रोज येत होता आणि अशा परिस्थितीचा तुम्हाला सामना करावा लागला असता तर?, आता हा विचारही करवत नाहीय. कोव्हीड काय याबाबत मी अनभिज्ञ होतो,'' असेही तो म्हणाला.   

जसजसे दिवस पुढे जात होते, तस तसा विश्वास वाढत होता, असे त्यानं सांगितला. ''चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनानं काळजी घेतली. KKR CEO यांनीही खूप काळजी घेतली. मला घरी सुरक्षित पोहोचवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले,''असे तो म्हणाला. सेईफर्टनं न्यूझीलंडसाठी ३५ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामने खेळले आहेत.  

पाहा व्हिडीओ..

Read in English

Web Title: KKR’s Tim Seifert breaks down while sharing his experience after contracting COVID-19 during IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.