कोरोना व्हायरसचं देशावर संकट असताना सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण होतील अशा पोस्ट फिरत आहेत. कुस्तीपटू बबिता फोगाटची तबलिगी जमातवरील वादग्रस्त पोस्ट, पालघरमधील साधुंच्या हत्येला दिला जाणारा धार्मिक रंग आणि त्यावरून पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडून झालेले वार्तांकन अन् त्यानंतर झालेला हल्ला, या सर्वच गोष्टी चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत. अशात भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण यांनी लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाण करून देणारे ट्विट केले आहे.
इरफान पठाणने ट्विट केले की,''कोणत्याही बातमीवर लक्ष देण्यापूर्वी आणि तिला भावनात्मक रूप देण्यापूर्ती त्याची खातरजमा करणे, ही आपली जबाबदारी नाही का? बातमीचे सत्य पुन्हा तपासणे आपले कर्तव्य नाही का ??? # मीडिया # थिंक''
Video: धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे; आता तरी सुधरा...; इरफान पठाणचा मार्मिक टोला
यापूर्वी इरफान पठाणनं धर्मांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला होता. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देश एकजुटीनं लढाई देत आहे. पण, काही माथेफिरू लोकं यातही जात-धर्माची पोळी शेकवत आहेत. भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनं अशा लोकांना सज्जड दम भरला आहे.
पोस्ट केलेल्या व्हिडीओत तो म्हणतो,''जगाच्या निर्मितापासून धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे. पण, खेदाची बाब ही की समजुतदारही आंधळा होत चालला आहे. काही मोजक्या लोकांनी धर्माचा धंदा सुरू केला, आता हा धंदा पण घाणेरडा होत चालला आहे. तुम्ही आपसात भांडाल आणि त्याला फायदा तिसराच उचलेले. आता तरी सुधरा, आता तर तुमच्याकडील वेळही कमी होत चालला आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या...
सचिननं 26/11 हल्ल्यातील शहिदांना वाहिली होती अनोखी श्रद्धांजली...
अंजलीला 'डेट' करण्यासाठी सचिन तेंडुलकर सरदार बनला, अन्...
विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा
2007मध्ये निवृत्ती घेणार होता सचिन तेंडुलकर, पण परदेशातून फोन आला अन्...
गौतम गंभीरनं जपली माणुसकी; घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः केले अंत्यसंस्कार