IPL will help spread positivity during the Covid-19 pandemic; Shikhar Dhawan svg | ... म्हणून आयपीएल-13 खेळवायला हवी; टीम इंडियाच्या 'गब्बर'चं लय भारी लॉजिक

... म्हणून आयपीएल-13 खेळवायला हवी; टीम इंडियाच्या 'गब्बर'चं लय भारी लॉजिक

ठळक मुद्दे29 मार्च ते 24 मे या कालावधीत होणार होती आयपीएल स्पर्धाकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ती पुढील सुचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी फुटबॉल सामन्यांना आता सुरुवात झाली असली तरी प्रेक्षकांविनाच त्यांना खेळावं लागत आहे.  इंडियन प्रीमिअर लीगवर ( आयपीएल) अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. देशातील सद्यस्थिती पाहता, आता तरी ती खेळवली जाईल, याची शक्यता फार कमी आहे. पण, आयपीएल खेळवायला हवी, असं मत भारताचा सलामीवीर शिखर धवननं व्यक्त केलं आहे आणि त्यामागे त्यानं एक लॉजिकही सांगितलं आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 55लाखांच्या वर गेला आहे. त्यापैकी 23 लाख रुग्ण बरे झाले आहेत, परंतु जवळपास साडेतीन लाख रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 38, 917 इतकी झाली आहे. त्यापैकी 57,721 रुग्ण बरे झाले आहेत, तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना व्हायरसच्या संकटात आयपीएलच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्यात मदत होईल आणि लोकांचं मनही प्रसन्न राहिल, असं मत धवननं व्यक्त केलं. त्यामुळे यंदा आयपीएल होईल अशी आशा त्याला आहे.  29 मार्च ते 24 मे या कालावधीत आयपीएल होणं अपेक्षित होतं, परंतु कोरोनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) पुढील सुचनेपर्यंत लीग स्थगित करावी लागली आहे.

''देशातील वातावरण आणि मूड बदलण्यासाठी क्रीडा स्पर्धा होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आयपीएल सुरू झाल्यास, त्याचा मोठा परिणाम दिसून येईल,'' असं धवन म्हणाला. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यू याच्याशी चर्चा करताना तो बोलत होता. त्यानं पुढे सांगितले की,''प्रत्येकाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आयपीएल झाल्यास ते आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. शिवाय त्यामाध्यमातून जगभरातील लोकांमध्ये सकारात्मकताही पसरण्यास मदत होईल.''

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या जागी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळवण्यात येईल अशी चर्चा आहे. ''आयपीएल होईल, अशी आशा व्यक्त करतो. मी नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करतो. त्यामुळे आयपीएल झाल्यास ते सर्वांसाठी चांगलं असेल. आयपीएल प्रेक्षकांविना झाल्यास, आम्ही ते दिवस मिस करू. चाहत्यांसमोर खेळण्याची मजा काही निराळीच असते.''

उसेन बोल्टवर ब्रिटिश मॉडलचे गंभीर आरोप; प्रेयसी गर्भवती असताना करायचा अश्लील मॅसेज

ईदच्या निमित्तानं इरफान पठाणनं देशवासियांना दिल्या अशा शुभेच्छा, पाहा Video 

क्रीडा विश्वात हळहळ! तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारे बलबीर सिंग यांचे निधन

Video : दिव्यांग मुलाची गोलंदाजी पाहून व्हीव्हीएस लक्ष्मण थक्क; तुम्हीही पडाल प्रेमात

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL will help spread positivity during the Covid-19 pandemic; Shikhar Dhawan svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.