आयपीएल ९ एप्रिलपासून; बीसीसीआय सूत्रांची माहिती

बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, पुढील आठवड्यात संचालन समितीच्या बैठकीदरम्यान तारखा व स्थानांना औपचारिक मंजुरी मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 05:48 AM2021-03-07T05:48:53+5:302021-03-07T05:49:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL from April 9; BCCI sources said | आयपीएल ९ एप्रिलपासून; बीसीसीआय सूत्रांची माहिती

आयपीएल ९ एप्रिलपासून; बीसीसीआय सूत्रांची माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देबीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, पुढील आठवड्यात संचालन समितीच्या बैठकीदरम्यान तारखा व स्थानांना औपचारिक मंजुरी मिळेल

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आगामी सत्राची सुरुवात इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका संपल्यानंतर १२ दिवसांनी ९ एप्रिलपासून होणार असल्याचे वृत्त आहे. ही माहिती भारतीय क्रिकेट बोर्डच्या (बीसीसीआय) एका सूत्राने शनिवारी दिली. इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना पुणे येथे २८ मार्च रोजी खेळल्या जाईल. या लोकप्रिय टी-२० लीगचा अवधी टीम इंडियाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बघून निश्चित करण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, पुढील आठवड्यात संचालन समितीच्या बैठकीदरम्यान तारखा व स्थानांना औपचारिक मंजुरी मिळेल.’ कोविडचा प्रभाव कमी करण्यासाठी बीसीसीआयने सध्याच्या स्थितीत आयपीएलच्या सामन्यांचे पाच शहरांत चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली व अहमदाबाद येथे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरात सामन्यांच्या आयोजनासाठी मंजुरी घ्यावी लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. चेन्नई व कोलकातामध्ये सामन्यांच्या तारखा पुढील काही आठवड्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निश्चित करण्यात येतील. 

Web Title: IPL from April 9; BCCI sources said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.