Kavya Maran Reaction on Pat Cummins 3rd Wicket : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ५५ वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय सार्थ ठवताना त्याने पहिल्याच चेंडूवर करुण नायरच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पहिला धक्का दिला. दिल्लीच्या सलामीवीराला पॅट कमिन्सनं खातेही उघडू दिले नाही.
पॅटनं पॉवर प्लेमध्येच काव्याला केलं 'सरप्राइज'
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट मिळवत पॅट कमिन्सनं आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. एवढेच नाही तर आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरही त्याने फाफ ड्युप्लेसिसच्या रुपात दुसरे यश मिळवले. विकेट्स घेण्याचा हा सिलसिला त्याने तिसऱ्या ओव्हरमध्येही कायम ठेवला. पहिल्या स्पेलमधील तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पॅटनं अभिषेक पोरेलच्या रुपात तिसरी विकेट घेतली. इशान किशन याने अभिषेक पोरेलचा एक उत्तम कॅच घेतला. ही विकेट पॅटच्या खात्यात जमा झाल्यावर स्टँडमध्ये उपस्थितीत असलेली संघाची मालकीण काव्या मारन हीची रिॲक्शन बघण्याजोगी होती. पॅट कमिन्सचा अप्रतिम स्पेल बघून ती सरप्राइज झाल्याचे दिसून आले. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं गमावल्या चार विकेट्स
पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची अवस्था खूपच बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अभिषेक पोरेलच्या रुपात १५ धावांवर तिसरी विकेट गमावली होती. हर्षल पटेलनं पॉवर प्लेमध्ये अक्षर पटेलच्या रुपात दिल्लीच्या संघाला आणखी एक धक्का दिला. संघाची दमदार कामगिरी बघून काव्या मारून खूश दिसली. पण पॅट कमिन्स पहिल्या तीन ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पॅटर्न बघून ती थोडी आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2025 SRH vs DC Sunrisers Hyderabad Owner Kavya Maran Reaction on Pat Cummins 3rd Wicket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.