Sanju Samson fined, IPL 2025 RR vs GT: शुबमन गिलच्या गुजरात टायटन्स संघाने संजू सॅमसनच्याराजस्थान रॉयल्सवर तब्बल ५८ धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या ८२ धावा, शाहरूख खानच्या ३६ धावा आणि जॉस बटलरच्या ३६ धावांच्या बळावर गुजरात संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव शिमरॉन हेटमायरचे अर्धशतक (५२), संजू सॅमसनच्या ४१ धावा आणि रियान परागच्या २६ धावांच्या जोरावर केवळ १५९ धावांवर संपुष्टात आला. राजस्थानने सामना तर गमावला, पण त्यासोबतच संजू सॅमसनला लाखो रूपयांचा दंड बसला.
गुजरातच्या संघाच्या फलंदाजीच्या वेळी संजू सॅमसनकडून चूक घडली. आयपीएलने एक प्रेस रिलीज जारी करून राजस्थान रॉयल्सच्या खेळाडू आणि कर्णधारावर ठोठावण्यात आलेल्या दंडाची माहिती दिली. राजस्थानच्या कर्णधाराला स्लो ओव्हर रेटसाठी २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात खेळलेल्या उर्वरित खेळाडूंनाही ६ लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या २५ टक्के यापैकी जे शुल्क जास्त असेल, तितका दंड ठोठावण्यात आला आहे. यात इम्पॅक्ट खेळाडूचाही समावेश आहे.
षटकांच्या गतीबाबत (Slow Over Rate Rule) IPLच्या नियमावली नुसार,
- षटकांची गती कमी राखण्याची चूक पहिल्यांदा झाली तर गोलंदाजी टीमच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड केला जातो.
- पुन्हा दुसऱ्यांदा तशीच चूक झाल्यास गोलंदाजी टीमच्या कर्णधाराला २४ लाखांचा दंड केला जातो. त प्लेइंग इलेव्हन मधील इतर १० खेळाडूंना ६ लाख किंवा त्यांच्या सामन्यातील मानधनाच्या २५% यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात येतो.
- तिसऱ्यांदा अशी चूक घडल्यास घडल्यास गोलंदाजी टीमच्या कर्णधाराला ३० लाखांचा दंड केला जातो आणि त्यापुढच्या एका सामन्यासाठी खेळण्यावर बंदी घातली जाते. तर प्लेइंग इलेव्हन मधील इतर १० खेळाडूंना १२ लाख किंवा त्यांच्या सामन्यातील मानधनाच्या ५०% यापैकी जे कमी असेल तेवढा दंड ठोठावण्यात येतो. तशीच चूक पुढे होत राहिल्यास, हाच नियम पुन्हा पुन्हा लावला जातो.
Web Title: IPL 2025 Sanju Samson fined rupees 24 lakh for Rajasthan Royal second over-rate offence RR vs GT may face match ban
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.