IPL 2025 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru, 28th Match : आयपीएल २०२५ स्पर्धेतील २८ वा सामना जयपूरच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं दमदार खेळी केली. राजस्थानच्या डावातील १६ षटकात यशस्वी जैस्वाल ७५ धावांवर खेळत होता. त्याच्या रुपात यंदाच्या हंगामातील चौथे शतकही एका डावखुऱ्या फलंदाजाच्या भात्यातून पाहायला मिळेल, असे वाटत होते. पण जोश हेजलवूडच्या षटकात तो फसला अन् पायचित होऊन त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक, पण...
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात त्याने ६७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. या सामन्यात तो अवघ्या ६ धावांवर माघारी फिरल्याचे पाहायला मिळाले. पण जयपूरच्या मैदानात फलंदाजांसाठी मुश्किल वाटत असलेल्या खेळपट्टीवर त्याने आपल्या बॅटिंगमधील क्लास खेळीचा नजराणा पेश केला. जैस्वालनं ४७ चेंडूत १० चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली. जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात तो फसला अन् त्याने आपली विकेट गमावली .
IPL 2025 : प्रत्येक सामन्यात लक्षवेधी कामगिरी करतोय दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील हा नवा चेहरा
अखेरच्या षटकात ध्रुव जुरेलची फटकेबाजी
यशस्वी जैस्वाल याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात संयमी सुरुवात केली. सेट झाल्यावर त्याने काही सुरेख फटके मारताना ३५ चेंडूत अर्धशतकसाजरे केले. दुसऱ्या बाजूला कर्णधार संजू सॅमसन १५ धावा करून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या रियान परागने ३० धावांची खेळी केली. यशस्वीनं आउट झाल्यावर ध्रुव जुरेल याने २३ चेंडूत केलेल्या ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने निर्धारित २० षटकात १७३ धावा करत बंगळुरुसमोर १७४ धावांचे टार्गेट सेट केले.
Web Title: IPL 2025 RR vs RCB Yashasvi Jaiswal Scond Fifry This Season Missed Chance Of Century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.