आयपीएलच्या १८ व्या हंगामातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौ सुपर जाएंट्सला पराभूत करत टॉप २ मधील आपले स्थान पक्के केले. या सामन्यातील निकालानंतर १९ गुणांसह RCB चा संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला. पंजाब किंग्जचा संघाच्या खात्यातही १९ गुण आहेत. पण उत्तम धावगतीमुळे पंजाब किंग्जचा संघ टॉपर ठरला. गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह तिसऱ्या तर मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या स्थानावर राहिला. आता प्लेऑफ्समधील चार संघापैकी अव्वल दोन संघ पहिल्या क्वॉलिफायरमध्ये थेट फायनल गाठण्यासाठी भिडतील. दुसरीकडे हार्दिक पांड्याला एलिमिनेटरमध्ये एक्स टीमचा सामना करावा लागेल. इथं एक नजर टाकुयात प्लेऑफ्समध्ये कोणता संघ कधी कुठं कुणाविरुद्ध मैदानात उतरणार त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्लेऑफ्समधील दोन अव्वल संघ थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
प्लेऑफ्समध्ये अव्वल दोन स्थानावर असलेल्या पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात २९ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात येईल. २९ मे रोजी मुल्लानपूर येथे रंगणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ थेट फायनल गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्यांना दुसऱ्या क्वॉलिफायर लढतीतून फायनल गाठण्याची एक संधी असेल.
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
हार्दिक पांड्यासमोर 'एक्स'चं चॅलेंज, फायनलच्या वाटेत दोन अडथळे
एलिमिनेटरमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससमोर शुबमन गिलच्या गुजरात टायटन्सचे चॅलेंज असेल. हार्दिक पांड्या याने पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सला चॅम्पियन केले होते. गत हंगामात हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सची साथ सोडून पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी केलीये. गत हंगामात लाजिरवाण्या कामगिरीनंतर यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेऑफ्समध्ये स्थान मिळवलंय. हार्दिक पांड्या एक्स टीम विरुद्ध बाजी मारत मुंबई इंडियन्सला फायनलच्या दिशेनं घेऊन जाणार का? ते पाहण्याजोगे असेल. ३० मे रोजी दोन्ही गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटरचा सामना खेळवण्यात येईल. दोन्ही संघासाठी पहिला अडथळा हा एलिमिनेटरची लढत आणि दुसरा अडथळा म्हणजे क्वालिफायर २ ची लढाई असेल. या दोन लढती जिंकल्या तरच तिसऱ्या चौथ्या स्थानावरील संघ फायनल खेळताना दिसेल.
क्वॉलिफायर २ सह फायनल सामना कधी अन् कुठं रंगणार?
क्वालिफायर १ मधील विजेता थेट फायनलमध्ये एन्ट्री मारेल. या संघातील पराभूत संघ एलिमिनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर २ मध्ये खेळताना दिसेल. ही लढत १ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या सामन्यातील विजेता ३ जूनला क्वालिफायर १ मधील विजेत्या विरुद्ध फायनल खेळेल. हा सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
प्लेऑफ्समधील लढतींचे वेळापत्रक
- क्वालिफायर १ : २९ मे २०२५, पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - मुल्लानपूर
- एलिमिनेटर : ३० मे २०२५, मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - मुल्लानपूर
- क्वालिफायर २ : १ जून २०२५, क्वालिफायर १ पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता - अहमदाबाद
- फायनल : ३ जून २०२५, क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता - अहमदाबाद
(हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होतील.)
Web Title: IPL 2025 Playoffs Schedule Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1 And Gujarat Titans vs Mumbai Indians Eliminator Know Full Schedule List Of Matches Dates And Venues
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.